• Tue. Jan 7th, 2025
    शरण कधी जायचं? वेळ आणि दिवस वाल्मिक कराडने ठरवला! हात जोडत पुणे CID ऑफिसच्या पायऱ्या चढला

    Beed Crime : वाल्मिक कराड हा हात जोडत सीआयडी ऑफिसच्या पायऱ्या चढला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला होता. याशिवाय सीआयडी अधिकारी आणि कराडच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होती.

    Walmik Karad Surrender : शरण कधी जायचं? वेळ आणि दिवस वाल्मिक कराडने ठरवला! माध्यमांचा गराडा, हात जोडत पुणे CID ऑफिसच्या पायऱ्या चढला

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी केसमधील आरोपी वाल्मिक कराड अखेर मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. वाल्मिक कराड याने व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडत शरण येणार असल्याचे सांगितले होते. आता सीआयडीचे अधिकारी त्याची चौकशी करणार असून, त्यानंतर अटकेची कारवाई केली जाणार आहे. त्याला सीआयडीच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाकडे पुढील चौकशीसाठी सोपविले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

    वाल्मिक कराड हा हात जोडत सीआयडी ऑफिसच्या पायऱ्या चढला. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्याला गराडा घातला होता. याशिवाय सीआयडी अधिकारी आणि कराडच्या कार्यकर्त्यांचीही गर्दी होती.

    सीआयडी अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

    या प्रकरणात सीआयडीच्या तपासाला वेग आला आहे. तपास पथकाने संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर आरोपींनी गाडीत सोडलेले दोन स्मार्टफोन जप्त करून तांत्रिक विश्लेषणासाठी पाठवले आहेत, तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकीचीही तपासणी केली जात आहे, तसेच अनेकांची चौकशी केली आहे.
    Walmik Karad : मी वाल्मिक कराड, न्यायदेवता देईल ती शिक्षा भोगण्यास तयार; स्वतःच Video शेअर करत पोलिसांना शरण
    या गुन्ह्याच्या तपासादरम्यान दोन स्मार्टफोन जप्त केल्यानंतर गेल्या २४ तासात अनेक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. आणखी लोकांची चौकशी केली जाणार आहे, तसेच मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, चारचाकीचीही तपासणी सुरू आहे, असे सीआयडीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

    Walmik Karad : ज्योती जाधव ही वाल्मिक कराडची दुसरी बायको, संतोष देशमुख यांच्या भावाचा खळबळजनक दावा

    वाल्मिक कराडच्या व्हिडिओमध्ये काय?

    मी वाल्मिक कराड, बीड जिल्ह्यात केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही, सीआयडी ऑफिस, पाषाण रोड, पुणे येथे मी सरेंडर होत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी आढळलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असं वाल्मिक कराड यांनी शरणागती पत्करण्यापूर्वी व्हिडिओ शेअर करत सांगितलं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *