• Wed. Jan 1st, 2025
    व्हॉट्सअप स्क्रीनशॉटनंतर जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

    बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अनेक गंभीर आरोप केले जात आहेत. काल बीडमध्ये आक्रोश मोर्चासाठी जितेंद्र आव्हाड हे दाखल झाले. त्यानंतर काही व्हॉट्सअप स्क्रीनशॉट हे व्हायरल होताना दिसत आहेत. आता यावर जितेंद्र आव्हाड हे बोलले आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलीये. या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. अनेक आरोप केले जात आहेत. राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बीडमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अजूनही या प्रकरणातील तीन आरोपी हे फरार आहेत. आरोपींना अटक करण्याची मागणी केली जातंय. काल बीडमधील आक्रोश मोर्चात मोठे नेते दाखल झाले होते. जितेंद्र आव्हाड हे देखील यावेळी पोहोचले होते.

    जितेंद्र आव्हाड यांच्या काही व्हॉट्सअप चार्टचे स्क्रीनशॉट व्हायरल होताना दिसले, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलताना जितेंद्र आव्हाड त्या चार्टमध्ये दिसत होते. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. आता याबद्दल मोठी माहिती पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी दिली. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, माझे काल भाषण संपले आणि त्यानंतर व्हॉट्सअप चार्ट व्हायरल झाली. मी वापरत असलेला फोन आणि चार्टवरील सिग्नल वेगळे आहे. माझा डिपीतील फोटो देखील चुकीचा आहे.
    संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठे अपडेट, सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी…मी याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केलीये. मराठी माझा खाजगी माणूस टाईप करतो. मी कधीच टाईप करत नाही. या लोकांची खानेरडी मानसिकता किती आहे, यावरून कळते. दलित मुसलमान असे चार्टमध्ये उल्लेख आहेत. हे दलित आणि मुस्लिम बाजारात विकत ठेवेल आहेत का? किती जाती धर्मद्वेष भरला आहे यांच्यात. वकील यांनी सांगावे कोणी चार्ट दिली आहे, असेही रूपाली ठोंबरे यांना टोला देत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

    एसपीला विनंती आहे, या बाबत चाैकशी करावी. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ असा मॅसेज मी शोधत आहे. नंबर देखील शोधत आहे. मी घाबरत नाही, असेही सांगताना यावेळी जितेंद्र आव्हाड हे दिसले. तुम्ही माणसे मारणार मी त्याच जातीत आहे. मी साहेबाच्या पक्षातील कार्यकर्ता आहे. मी अजित पवार यांना एकेरी शब्द बोलत नाही. सन्मानाने मी अजित पवार साहेब बोलतो. सोमनाथ सूर्यवंशी न्याय मिळाला नाही, अजून दुःख वाटते, असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed