Gondia Crime News: दफनविधी करतेवेळी मानसीच्या शरीरावर काही व्रण दिसून आले. मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे, असा संशय तिच्या नातेवाइकांनी व्यक्त केला
मानसी ताराचंद चामलाटे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. गुनिता ताराचंद चालमाटे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मानसीच्या आईचे नाव आहे. मानसी ही आई गुनिता ताराचंद चामलाटे सोबत नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरातील नांदा येथे राहत होती. गुरुवार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास मानसीचा मृत्यू झाला. मुलीचा मृतदेह घेऊन गुनिता ही आपल्या स्वगावी पालेवाडा हेटी येथे आली. प्रकृती बरी नसल्याने मानसीचा मृत्यू झाल्याचे गुनिताने गावकऱ्यांना सांगितले. शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी दुपारी हेटी येथील समशानभूमीत मानसीचा दफनविधी पार पडला. मात्र, दफनविधी करतेवेळी मानसीच्या शरीरावर काही व्रण दिसून आले. मानसीच्या मृत्यू मागे काहीतरी गुढ असावे, असा संशय तिच्या नातेवाइकांनी व्यक्त केला. त्यानुसार मानसीची मोठी आई कलाबाई चामलाटे यांनी शुक्रवारी रात्री गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत गोरेगाव पोलिसांनी तहसीलदार गोरेगाव व उपविभागीय अधिकारी तिरोडा यांच्या समक्ष हेटी येथील स्मशानभूमीत पुरण्यात आलेला मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी गोंदिया येथील केटीएस रुग्णालयात पाठवला. यासंदर्भात गोरेगाव पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पोलिसांनी चोकशीसाठी मृत मानसीची आई गुनिता चामलाटे हिला ताब्यात घेतले आहे.
राष्ट्रवादीचे ‘चलो दिल्ली’; विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची यादी जाहीर
अहवालानंतर पुढील कारवाई
दरम्यान, उत्तरीय तपासणी अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. सदर घटना पोलिस ठाणे खापरखेडाच्या (नागपूर ग्रामीण) हद्दीतील असल्याने हे प्रकरण खापरखेडा पोलिसांकडे वर्ग करण्यात येईल, असे आमगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांनी सांगितले.