• Sun. Dec 29th, 2024

    ‘मटा’दणका! राष्ट्रीय दुखवटा असतानाही अजय-अतुल यांच्या ऑर्केस्ट्राचे जंगी आयोजन; मटाच्या बातमीमुळे कार्यक्रम अखेर रद्द

    ‘मटा’दणका! राष्ट्रीय दुखवटा असतानाही अजय-अतुल यांच्या ऑर्केस्ट्राचे जंगी आयोजन; मटाच्या बातमीमुळे कार्यक्रम अखेर रद्द

    Ajay Atul Orchestra In Jalgaon Cancel : जळगावात ३१ डिसेंबर रोजी होणारा अजय – अतुल यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. आयोजनकांनी मेल करत यासंबंधी माहिती दिली आहे.

    Lipi

    निलेश पाटील, जळगाव : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेल्या टुरिझम प्रकल्पावर ३१ डिसेंबर रोजी अजय – अतुल यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र आत त्या कार्यक्रमाचे आयोजन आयोजकांकडून रद्द करण्यात आले आहे. यासंबंधी मेलदेखील प्राप्त झाला आहे.

    जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यामध्ये गारखेडा टुरिझम प्रकल्प सार्वजनिक बांधकाम विभागाने उभारलेला आहे. या प्रकल्पावर येत्या ३१ डिसेंबरला अजय – अतुल यांचा भव्य दिव्य ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाल्याने सात दिवसांचा राष्ट्रीय दुःखवटा जाहीर केला आहे. या दरम्यान गारखेडा या ठिकाणी अजय – अतुल यांच्या ऑर्केस्ट्राचं भव्य दिव्य आयोजन करण्यात आलं होतं, मात्र देशांमध्ये सात दिवसाचा दुखावटा असतानाही हे आयोजन रद्द करण्यात आले नव्हते. याबाबत महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनासह आयोजकांना खडबडून जाग आली असून हा कार्यक्रम अखेर त्यांना रद्द करावा लागला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनने बातमी प्रकाशित केल्यानंतर सर्व प्रशासकांसह आयोजक खडबडून जागे झाले. त्यानंतर संध्याकाळी अनिकेत पाटील यांच्या मेलवरून सदर कार्यक्रम हा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. आता लवकरच पुढची तारीख ठरवण्यात येईल असं मेलमध्ये सांगण्यात आलं आहे. आगामी काळात लवकरच हा कार्यक्रम होणार असून याबाबत कळवले जाईल, अशी माहिती अनिकेत पाटील यांच्या मेल करून प्राप्त झालेली आहे.
    देशात सात दिवसांचा दुखवटा; मात्र जळगावात ३१ डिसेंबरला अजय-अतुलचा ऑर्केस्ट्रा
    देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे २६ डिसेंबर रोजी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा असून या दुखवटामध्ये कुठलेही प्रशासकीय आणि औपचारिक कार्यक्रम घेतले जात नाहीत. त्यामुळे जळगाव शहरात २७ डिसेंबर रोजी खानदेश महोत्सवाचे करण्यात आलेले आयोजन रद्द आले होते. या महोत्सवाला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शासकीय दुखवटा असल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं.

    देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाल्याने कुठलेही कार्यक्रम घेतले जात नाही, यामुळे खानदेश महोत्सवाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला होता, खानदेश महोत्सवाचा कार्यक्रम रद्द होतो, तर अजय – अतुल यांचा जामनेर तालुक्यातील गारखेडा येथे होणाऱ्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम का रद्द होत नाही? हा सवाल महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने उपस्थित केला होता. या; बातमीची दखल घेत आयोजकांना अखेर अजय-अतुल यांचा ऑर्केस्ट्राचा ३१ डिसेंबर रोजी होणारा कार्यक्रम रद्द करावा लागला.

    ‘मटा’दणका! राष्ट्रीय दुखवटा असतानाही अजय-अतुल यांच्या ऑर्केस्ट्राचे जंगी आयोजन; मटाच्या बातमीमुळे कार्यक्रम अखेर रद्द

    आजोकांतर्फे अनिकेत पाटील यांच्याकडून सर्व प्रसिद्धी माध्यमांना मेल पाठवण्यात आला आहे. देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी होणारा अजय-अतुल यांचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे आणि पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असं आलेल्या ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    निलेश पाटील

    लेखकाबद्दलनिलेश पाटीलमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन मध्ये जळगाव ‘जिल्हा प्रतिनिधी’ म्हणून कार्यरत. गेल्या 12 वर्षापापूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात. तरुण भारत, सकाळ, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजमधून प्रवास करीत मटा ऑनलाइनपर्यंत प्रवास.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *