सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचं अंजली दमानिया यांनी सांत्वन केलं.संतोष देशमुख प्रकरणाती आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला.बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अंजली दमानिया हे आंदोलन करणार आहेत.वाल्मिक कराड याला अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोन मुद्दे घेऊन आंदोलन करणार असल्याचं दमानिया यांनी सांगितलं.