• Sat. Dec 28th, 2024

    अंजली दमानिया यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, फरार तीन आरोपींचा खून, फोन आल्याचा दावा

    अंजली दमानिया यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासा, फरार तीन आरोपींचा खून, फोन आल्याचा दावा

    बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन आरोपी अद्याप फरार असून, अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या प्रकरणात काही गंभीर आरोप हे सातत्याने केले जात आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलीये. या हत्येनंतर गंभीर आरोप केले जात आहेत. आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या प्रकरणातील तीन आरोपींना अजून अटक झाली नाहीये. आता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येतील तीन आरोपींबद्दल अत्यंत धक्कादायक आणि हैराण करणारा खुलासा केलाय. अंजली दमानिया यांच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलीये.

    अंजली दमानिया यांनी म्हटले की, मला एक फोन आला आणि सांगण्यात आले की, संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार तीन आरोपींचा खून करण्यात आलाय. जोपर्यंत या हत्येतील आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत मी बीडला राहणार आहे. हेच नाहीतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी थेट मागणीच अंजली दमानिया यांनी केली आहे. वाल्मिक कराड यांच्याबद्दल बोलताना देखील अंजली दमानिया या दिसल्या आहेत.
    Rupali Patil : प्राजक्ता ताईंना कशाला बदनाम करताय धस भाऊ? रुपाली पाटील संतापल्या, त्यांच्या खाजगी आयुष्यात…यापूर्वीच अंजली दमानिया या धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना दिसल्या आहेत. काल वाल्मिक कराड यांच्या पत्नी यांची सीआयडीकडून दोन तास चाैकशी करण्यात आलीये. सतत वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी ही केली जातंय. या घटनेबद्दल बोलताना धनंजय मुंडे यांनी थेट म्हटले होते की, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीच झाली पाहिजे, ही माझी भूमिका आहे.

    मला समाजकारणातून आणि राजकारणातून संपवण्यासाठी हे सर्व आरोप केले जात आहेत. आजच्या बीडच्या मोर्चाबद्दल मनोज जरांगे पाटील यांनीही मोठे भाष्य केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठ्यांनी बीडमध्ये होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, कोणीही आज घरी राहायचे नाही. बीडमधील मोर्चाने सरकारला जाग येईल, असेही जरांगे यांनी म्हटले आहे. आता बीडमध्ये पोलिसांचा मोठा पोलिस बंदोबस्त देखील बघायला मिळतोय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed