Uddhav Thackeray offered chadar to Ajmer Sharif Dargah : उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ८१३ व्या उरुसनिमित्त चादर अर्पण केली.
विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने शिवसेना (उबाठा) पक्षाच्या नेत्यांकडून शिवसर्वेक्षण यात्रा काढण्यात आली होती. यात पक्षातर्फे नेमण्यात आलेल्या निरीक्षकांनी आपला अहवाल सादर केला आहे.
ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका
महापालिका निवडणूक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरीस मुंबईतील विधानसभा मतदारसंघनिहाय उद्धव स्वत: पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत. महापालिका निवडणूक पक्षाने स्वबळावर लढावी, अशी मागणी अनेक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याने याबाबत ते त्यांची मते जाणून घेणार असल्याचे कळते.
Yogesh Kadam : गृह राज्यमंत्रिपद हाती, योगेश कदमांनी फटक्यात निकाल लावला, तिघे अटकेत, रॅकेटचं कंबरडं मोडलं
विधानसभा निवडणुकीत नेमक्या कोणत्या चुका झाल्या याबाबत आढावा घेऊन त्यानुसार रणनीती आखण्यासंदर्भात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगण्यात येते.
Vinod Kambli : मुलांनो दारु पिऊ नका, हॉस्पिटल बेडवरुन विनोद कांबळीची कळकळीची विनंती, क्रिकेट सोडण्याबाबत मोठं विधान
उरुसच्या निमित्ताने चादर अर्पण
उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याच्या ८१३ व्या उरुसनिमित्त चादर अर्पण केली. पक्षनेते विनायक राऊत, उपनेते नितीन नांदगावकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून अजमेर शरीफ दर्ग्याला चादर अर्पण; शिवसेनेची टीका, कधी साडी चोळी…
शिंदे गटाची टीका
“उबाठा ने अजमेरला चादर पाठवली म्हणे … पण कधी कोणत्या मंदिरात देवीला साडी चोळी पाठवली, असं काही ऐकण्यात किंवा पाहण्यात आहे का कुणाच्या ??? कुणाचं काय तर कुणाचं काय …” अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.