सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर…संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथील वसतिगृहाची पाहणी केली. वसतिगृहाची अतिशय दयनीय अवस्था पाहून आधीच्या सामाजिक न्याय मंत्र्यांनी…काही काम केले आहे की नाही, असा प्रश्न संजय शिरसाट यांना पडला. त्यांनी अधिकाऱ्यांची शाळा घेत गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने…सक्तीच्या रजेवर पाठवून उर्वरीत कारवाई लगोलग करू असे सांगितले.उद्विग्न प्रतिक्रिया देत वसतिगृहाच्या अधिकाऱ्यांना मंत्री शिरसाट यांनी फैलावर घेतले.