तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबाराची घटना घडली होती. तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी हा प्रकार घडला होता. 13 सप्टेंबरच्या मध्यरात्री धनंजय सावंत यांच्या सोनारी येथील घरावर अज्ञात आणि चार राऊंड फायर केले होते. मात्र त्याचा तपास अद्याप पूर्ण झालेला नाही पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. आणि अशातच धनंजय सावंत आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक केशव सावंत यांना धमकीचे पत्र आलंय. तुमचा पण मस्साजोगचा संतोष देशमुख करू अशी धमकी सावंत यांना देण्यात आल्याने एकच खळबळ उडालीय. आधी गोळीबार अन् आता धमकी पत्र या दोन घटना घडल्या असताना देखील पोलीस प्रशासन काहीच कारवाई करत नसल्याची खंत धनंजय सावंत यांनी व्यक्त केली आहे.