• Thu. Dec 26th, 2024
    सोमनाथ सूर्यवंशीची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप, CMवरही ताशेरे ओढले

    Rahul Gandhi Meet Somnath Suryawanshi Family Parbhani : राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं. तसेच, सोमनाथ यांच्या मृत्यूसाठी त्यांनी पोलिसांना जबाबदार धरलं आहे.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी: सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट मी पाहिला. त्यावरून स्पष्ट आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हा शंभर टक्के पोलीस कस्टडीमध्ये मारहाणीमुळे झाला आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनादरम्यान खोटी माहिती दिली आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या भेटीला पोहोचले होते.

    सोमनाथ सूर्यवंशी हा दलित समाजाचा होता आणि तो संविधानाची रक्षा करत होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही संविधान संपविण्याची आहे आणि त्यामुळेच सोमनाथ सूर्यवंशी या दलित युवकाचा खून केला असल्याची स्पष्टोक्ती खासदार राहुल गांधी यांनी दिली आहे.

    परभणी येथे १० डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंद पुकारण्यात आला होता. पण बंद दरम्यान दगडफेक लाठी चार जाळपोळ ची घटना घडली आणि त्यामध्ये तब्बल ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ५० जणांपैकीच असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडी दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर मात्र पोलीस आणि सरकार विरुद्ध प्रचंड आक्रोश निर्माण झाला आहे. त्या दरम्यान आज लोकसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे.

    पुढे बोलताना खासदार राहुल गांधी म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा संविधान विरोधी आहे. संविधानाची रक्षा करणाऱ्यांना ते त्रास देतात. सोमनाथ सूर्यवंशी देखील हा संविधानाची रक्षा करणारा युवक होता. म्हणूनच त्याचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राज्य सरकारने जी काही मदत आणि जो काही निर्णय जाहीर केला आहे त्याविषयी आम्ही संतुष्ट नाहीत. याविषयी कसल्याही प्रकारचं राजकारण नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयं संघाचे विचारधारा आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी हे स्टेटमेंट दिले आहे तो मुख्यमंत्री देखील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार आहे.

    आमच्या मुलाचा खून करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या – वत्सलाबाई सूर्यवंशी

    खासदार राहुल गांधी यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतली असता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई वत्सलाबाई सूर्यवंशी म्हणाल्या की राहुल गांधी आम्हाला भेटले. आमची विचारपूस केली संपूर्ण घटनाक्रम आम्ही त्यांना सांगितला. त्यावर ते म्हणाले की आपण लोकशाहीच्या मार्गाने त्यांच्याविरुद्ध आवाज उठवू. पण, जोपर्यंत माझा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी याला मारहाण करून मारण्यात आले त्या सर्व आरोपींना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि दोषी पोलीस अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे वत्सलाबाई सूर्यवंशी म्हणाले.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed