बीडमधील संतोष देशमुख प्रकरणामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना सहआरोपी करण्याची मागणी होत आहे.संतोष देशमुख प्रकरणामुळं धनंजय मुंडेंवरही विरोधक सातत्यानं टीका करत आहेत.वाल्मिक कराड यांना सहआरोपी न केल्यास बीडमध्ये मोर्चा काढणार, असा इशारा आमदार संदीप क्षीरसागरांनी दिलाय.