• Fri. Dec 27th, 2024

    Nashik News: कारभार अधांतरी! नाशिक महापालिका अधिकाऱ्यांची नागपूरवारी रितीच, प्रभारीही मिळेना

    Nashik News: कारभार अधांतरी! नाशिक महापालिका अधिकाऱ्यांची नागपूरवारी रितीच, प्रभारीही मिळेना

    Nashik News: नाशिक शहरातील प्रलंबित प्रकल्पाबाबत आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापालिकेचे नागपूर दौऱ्यावर गेलेले शिष्टमंडळ रिकाम्या हातानेच नाशिकमध्ये परतले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    कारभार अधांतरी!.

    नाशिक : नाशिक शहरातील प्रलंबित प्रकल्पाबाबत आमदारांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापालिकेचे नागपूर दौऱ्यावर गेलेले शिष्टमंडळ रिकाम्या हातानेच नाशिकमध्ये परतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीसाठी नागपूरला गेलेले शिष्टमंडळ शहराच्या विकासासंदर्भात कुठलाच ठोस निर्णय न होताच परतले.

    दरम्यान, पायाला दुखापत झाल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे पंधरा दिवस रजेवर गेले आहेत. परंतु, तीन दिवस लोटले तरी अद्यापही पालिकेचा पदभार सक्षम अधिकाऱ्याकडे सोपविण्यात आलेला नसल्याने पालिकेचे कामकाज ठप्प पडले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात नाशिकच्या प्रलंबित प्रकल्पांबाबत आमदार सीमा हिरे, देवयानी फरांदे आणि अॅड. राहुल ढिकले यांनी विधिमंडळात प्रश्न विचारून त्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, या निमित्ताने नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र नागपूरची वारी करून घेतली आहे.
    Dharavi Redevelopment Project: धारावीकरांसाठी मोठी गुड न्यूज; एकमजली झोपड्याही आता वाढीव घरासाठी पात्र
    आमदारांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तातडीने नागपूरला बोलाविण्यात आले. महापालिकेकडून समन्वय अधिकारी नियुक्त केला असतानाही पालिका प्रशासनाकडून त्यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी भलेमोठे पथक नागपूरला रवाना झाले होते. अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, नगररचना विभागाचे सहायक संचालक कल्पेश पाटील, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता संदेश शिंदे, रवींद्र बागूल या अधिकाऱ्यांचा लवाजमा नागपूरमध्ये दाखल झाला.
    नृत्य शिक्षकाचा अल्पवयीन मुलावर अत्याचार, समुपदेशनात सत्य समोर आलं अन् पोलिसांची मोठी कारवाई
    परंतुकीसाठी गेलेले अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीविनाच नाशिकला परतले आहेत. केवळ सचिवांना माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ नागपूरला गेले आणि रिकाम्या हाताने परतले अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे. ‘आयटी’ पार्क संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली असली, नमामि गोदा, मेट्रो निओ, रिंगरोड, सिंहस्थ निधीबाबतचे विषय मात्र प्रलंबित राहिले आहेत.
    लेकाच्या डोक्यावर अक्षता, पण वरमाईचे स्वप्न अधुरेच; ताम्हिणी घाट बस अपघातात नवरदेवाच्या आईचा मृत्यू
    कामकाज पंधरा दिवस राहणार ठप्प पायाला दुखापत झाल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर हे ३१ डिसेंबरपर्यंत रजेवर गेले आहे. त्यांनी नगरविकास विभागाकडे रजेचा अर्ज पाठवून तीन दिवस लोटले आहेत. परंतु, नगरविकास विभागाकडून अद्यापही महापालिकेचा कारभार सक्षम अधिकाऱ्याच्या हाती सोपविलेला नाही. तर दुसरीकडे अतिरिक्त आयुक्त नागपूरला गेल्याने पालिकेचे कामकाज जवळपास ठप्प पडले आहे. नियमित पदभार देईपर्यंत अतिरिक्त आयुक्त चौधरींवर धुरा असेल असे सांगितले जात असले तरी, ठोस निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महापालिकेचे कामकाज अधांतरी असून, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ठप्प झालेले कामकाज आता पुढील पंधरा दिवसही ठप्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिककरांना कोणीच वालीच नसल्याचे चित्र आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed