Mumbai Nilkamal Boat Accident: मुंबई गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या भीषण बोट अपघातात अभियंता मंगेश केळशीकर यांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेने केळशीकर कुटुंबाला मोठा आघात बसला आहे.
मंगेश मेकॅनिकल इंजिनियर होते, स्पीड बोटच्या इंजिनाची टेस्टिंग सुरू असताना हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मंगेश केळशीकर यांच्या निधनामुळे केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. दुर्दैवं म्हणजे मंगेश यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे आणि त्यांच्या कुटुंबात मंगेश हेच एकमेव कमावते होते. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक जाण्याने केळशीकर कुटुंबाचा आधार हरपला आहे. शासनाने तसेच सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात द्यावा असं आवाहन स्थानिक रहिवाशांनी केलं आहे.
Mumbai Boat Accident: मुंबई बोट अपघात प्रकरणात सर्वात मोठी माहिती; ‘या’ कारणामुळे धडकली नेव्हीची स्पीड बोट
१८ डिसेंबरला गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाच्या दिशेने प्रवासी घेऊन जात असलेल्या नीलकमल या प्रवासी बोटीला नौदलाची स्पीड बोट येऊन धडकली. नौदलाच्या या स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरु असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगात असलेली ही स्पीड बोट नीलकमल बोटीला येऊन धडकली. त्यामुळे ही प्रवासी बोट उलटली. यावेळी या बोटीत अनेक प्रवासी होते. त्यापैकी १३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर नौदलाच्याही ती कर्मचाऱ्यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. तर बचाव पथकाने १०१ हून अधिक लोकांचा जीव वाचवला आहे.
Mumbai Boat Accident: आई, गर्भवती पत्नी अन् लेकरु; मुंबई बोट अपघातात केळशीकरांचा आधार गेला, मन सुन्न करणारी कहाणी
या घटनेनंतर नौदलाची स्पीड बोट चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी सांगितलं आहे. भरधाव वेगात बोट चालवल्याप्रकरणी कुलाबा पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.