Santosh Deshmukh Murder Case Update: संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. संतोष देशमुखांना झालेल्या जबर मारहाणीमुळे त्यांचा जीव गेल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालातून मोठे कारण समोर आले आहे. संतोष देशमुखांचा मृत्यू ‘हॅमरेज टू मल्टिपल इन्जुरिज’मुळे झाल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली. संतोष देशमुखांच्या छाती, डोकं, हात-पाय आणि चेहऱ्यावर जबर मारहाण करण्यात आली आहे. यामुळे त्यांच्या चेहरा आणि डोळ्याची अवस्था बिकट होत. तर जबर मारहाणीमुळे संतोष देशमुख यांच्या शरीरातून अति रक्तस्त्राव झाला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
Santosh Deshmukh Murder: संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट, आरोपीसोबत भावाचा VIDEO; आदल्यादिवशी हॉटेलात काय घडलं?
पोस्टमार्टम असेही नमू्द करण्यात आले आहे की, देशमुखांना लोखंडाच्या पाईपने मारहाण करण्यात आली आहे. तर त्यांना तब्बल दीड तास मारहाण करण्यात आली. त्यांच्या अंगावर कुठेही फॅक्चर नाही. मात्र देशमुखांच्या शरीरावर एकूण ५६ जखमा आहेत. त्याच्या डोळ्यांना मारहाण करण्यात आली, मात्र जाळण्याचा प्रयत्न झालेला नाही. पाठीवर मात्र सर्वाधिक मुका मार बसला आहे. त्यांना इतक्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली की ज्यामुळे देशमुखांच्या पाठीवर हातावर आणि पायावर मारहाणीचे व्रण उठले होते.
केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं 9 डिसेंबरला अपहरण करण्यात आलं होतं, ते ज्या गाडीनं प्रवास करत होते, त्या गाडीला थांबवून सहा ते सात जणांनी त्यांचं अपहरण केल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.