• Sun. Jan 19th, 2025
    विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड

    राम शिंदे यांची महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. कर्जत-जामखेडमधून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांना हे पद मिळाले. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पदभार स्वीकारला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: नागपूरमध्ये सध्या अधिवेशन सुरू असून विधानपरिषदेला सुरूवात झालीये. विधानपरिषद सभापतीपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. राम शिंदे यांची सभापतीपदी निवड व्हावी असा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी बहुमताने राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड झाली. राम शिंदे यांनी आपल्या पदाचा कारभार स्वीकारला आहे. राम शिंदे यांनी विधानसभेची निवडणूक कर्जत जामखेडमधून लढवली होती. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्यात जोरदार टक्कर झाल्याचे बघायला मिळाले.

    राम शिंदे यांना बाराशे मत कमी मिळाल्याने पराभव स्वीकारावा लागला. राम शिंदे यांनी भाजपाकडून ही निवडणूक लढवली होती. आता राम शिंदे यांची सभापती म्हणून निवड करण्यात आलीये. विशेष म्हणजे राम शिंदे यांची बिनविरोध निवड झालीये. महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात आल्याचे नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केले. यानंतर राम शिंदे यांच्याबद्दल परिचय देताना निलिमा गोऱ्हे या दिसल्या. राम शिंदे यांची विधान परिषदेत आवाजी मतदानाने एकमताने निवड करण्यात आली आहे. यानंतर नीलिमा गोऱ्हे यांनी सभागृहात घोषणा केली.
    संतोष देशमुखांचं पोस्टमार्टम, डॉक्टरांचा शब्द न् शब्द विजयसिंह पंडितांनी सांगितला, सभागृह हादरलंराहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणीची नेमकी वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा रंगत होती. यानंतर आज भाजपाने राम शिंदे यांच्या नावाची विधानपरिषदेच्या सभापतीपदी निवड केली. राम शिंदे यांची बिनविरोध निवड होण्याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीकडे तेवढे संख्याबळ नसल्याने त्यांनी उमेदवार जाहीर केला नव्हता. विधानपरिषदेकडे फक्त राम शिंदे यांचा एकच अर्ज आला होता.

    बुधवारी राम शिंदे यांच्याकडून अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता राम शिंदे यांची निवड करण्यात आली. सभापती निवडीचा प्रस्ताव विधान परिषद सदस्य श्रीकांत शिंदे , उमा खापरे, शिवाजीराव गर्गे यांनी सभागृहात मांडला. या प्रस्तावाला सदस्या मनीषा कायंदे , अमोल मीटकरी, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. राम शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींच्या खुर्चीवर बसून पदभार सोपविला. तब्बल वीस वर्षानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधानपरिषद सभापतीपद मिळाले.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed