• Sun. Jan 19th, 2025

    नीलकमल बोट अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर, नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरोधात गुन्हा दाखल

    नीलकमल बोट अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर, नौदलाच्या स्पीड बोट चालकाविरोधात गुन्हा दाखल

    मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी फेरी बोटीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला असून, ११५ प्रवाशांना वाचवण्यात आले. नौदलाच्या स्पीड बोटीचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी नौदलाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बचावकार्य सुरू असून, बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमुलकुमार जैन रायगड : मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटा घारापुरीला निघालेल्या नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने बुधवारी (18 डिसेंबर) रोजी जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात प्रवासी बोट समुद्रात बुडाली आणि तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात वाचलेले नाथाराम चौधरी (वय 22) यांनी याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 125 (अ) (ब), 282, 324 (3) (5) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

    याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोटीचा चालक आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निष्काळजीपणामुळे 13 जणांच्या मृत्यूला कारभूत ठरल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नौदल, तटरक्षक दल व मुंबई पोलिसांनी राबवलेल्या बचाव कार्यात 115 जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, अद्याप दोघे बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

    नौदल स्पीड बोटीच्या इंजिनाची चाचणी करीत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारच्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली. या दुर्घटनेत 1 नौदल कर्मचारी, नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. 99 जणांना वाचवण्यात यश आले आहे. नीलकमल ही प्रवासी बोट प्रवाशांना घेऊन घारापुरीकडे जात होती. दुपारी 3.55 वाजता नौदलाच्या एका स्पीड बोटीने प्रवासी बोटीला उजव्या बाजूने जोरदा धडक दिली.

    धडकेनंतर नीलकमल बोट कलंडली आणि बुडू लागली. दोन्ही बोटींवर प्रवासी आणि कर्मचारी असे एकूण 115 जणांना बचाव कार्यात वाचवण्यात आले. यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. 97 जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. जखमींपैकी जेएनपीटी रुग्णालयात 75, नेव्हल डॉकयार्डमध्ये 25, अश्विनी रुग्णालयात एक, सेंट जॉर्जमध्ये नऊ, करंजे येथे 12, तर मोरा रुग्णालयात 10 जणांना दाखल करण्यात आले आहे.
    Mumbai Ferry Boat Accident : अपघातग्रस्त लाँचवर अख्खं कुटुंब चढणार होतं, पण मुंबईच्या वडापावने वाचवलं, अंजलीताई म्हणाल्या माझ्या मुलाने…नीलकमल बोटीवरील पाच कर्मचारी सुखरुप असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली. बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असून पोलिसांनी प्रत्यक्षदर्शीचे जबाब नोंदवले आहेत. अपघाताची चित्रफीतही व्हायरस झाली असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे नौदल अधिकाऱ्यांनी सांगितले. नौदलाच्या स्पीड बोटीमध्ये उत्पादक कंपनीचे चार प्रतिनिधी आणि नौदलाचे दोन अधिकारी होते. चाचणीवेळी झालेल्या अपघातात नौदल अधिकारी महेंद्र सिंग शेखावत व उत्पादक कंपनीचे दोन प्रतिनिधी प्रवीण शर्मा व मंगेश यांचा मृत्यू झाल्याची माहिती नौदलाकडून देण्यात आली आहे.

    ही दुर्घटना घडल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत नौदलाची स्पीडबोट प्रवासी बोटीला धडक देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. नाथाराम चौधरी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ काढला होता. तेच या प्रकरणातील तक्रारदार आहेत. अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. प्रवाशी घेऊन गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाण्यासाठी दुपारी सव्वातीनच्या सुमारास नीलकमल ही फेरी वाहतूक करणारी बोट रवाना झाली होती.
    हा अपघात झाला असल्याने नीलकमल बोट पाण्यात बुडाली, असा आरोप बोटीचे मालक राजेंद्र पडते यांनी केला आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed