Mumbai Coastal Road Accident : मुंबई कोस्टल रोडवर गुरुवारी सकाळी दोन कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामुळे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. नरिमन पॉइंटकडे जाणाऱ्या बोगद्यात हा अपघात घडला. दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि मदत करणारे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याचे दिसतंय. मात्र, या अपघात कितीजण जखमी आहेत, याबद्दल अजून काही माहिती मिळू शकली नाहीये. सकाळच्या वेळी कोस्टल रोडने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. सकाळच्या वेळीच हा अपघात झाल्याने काही वेळ वाहनांच्या रांगा बघायला मिळाल्या. मात्र, त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
Mumbai Ferry Boat Accident : अपघातग्रस्त लाँचवर अख्खं कुटुंब चढणार होतं, पण मुंबईच्या वडापावने वाचवलं, अंजलीताई म्हणाल्या माझ्या मुलाने…अपघातग्रस्त दोन्ही वाहने कोस्टल रोडमध्येच आहेत. पोलिसांकडून अगोदर कारवाई केली जाईल आणि दोन्ही वाहने कोस्टल रोडवरून हटवली जातील. 4 एप्रिल 2024 रोजी कोस्टल रोडमध्ये पहिला अपघात दोन वाहनांमध्ये झाला होता. एक कार विरूद्ध दिशेने गेल्याने तो अपघात झाला होता. कारचे स्टेअरिंग सैल झाल्याने तो अपघात झाल्याचे सांगितले गेले होते.
आज झालेला अपघात नेमका कसा झाला, याबद्दलची अजून माहिती मिळू शकली नाहीये. मात्र, व्हायरल फोटो आणि व्हिडीओनुसार दोन्ही कार एकमेकांच्या समोर दिसत आहेत. म्हणजे दोन्ही वाहने एकमेकांच्या समोर आल्याने हा अपघात झाला असावा. घटनास्थळी वाहतूक पोलिस पोहोचल्याचे दिसत आहे. कोस्टल रोडचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 10 मार्च रोजी उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीही उपस्थित होते.