Mumbai Gateway Of India Boat Accident: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एका प्रवासी बोटीचा भीषण अपघात झाला आहे. बोट उलटल्याने तीन प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर ७७ प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आलं आहे.
हायलाइट्स:
- मुंबई गेट वे ऑफ इंडियाजवळ बोट उलटली
- स्पीड बोटने प्रवासी बोटीला धडक दिली
- भीषण अपघाताचा लाइव्ह व्हिडिओ समोर
पाहा भीषण अपघाताची लाइव्ह दृश्य
एलिफंटाच्या दिशेने जाताना या नीलकमल नावाच्या प्रवासी बसला नेव्हीच्या स्पीड बोटने येऊन धडक दिली. ही स्पीड बोट प्रचंड वेगाने जात होती. पुढे जाऊन त्या बोटीने नागमोडी वळण घेतलं त्यानंतर ती नीलकमल या बोटीच्या दिशेने वेगात आली. यावेळी स्पीटड बोट चालवणाऱ्या व्यक्तीला प्रवासी बोटीच्या आणि स्पीड बोटमधील अंतराचा अंदाज आला नाही आणि बोट थेट प्रवासी बोटीला येऊन धडकली. त्यानंतर ही प्रवासी बोट उलटून मोठी दुर्घटना घडली.
ही स्पीड बोट नेव्हीची असल्याची माहिती मिळाल्यानंतर सध्या नेव्हीकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. तसेच, घटनास्थळी बचावकार्य पूर्ण झालं असून ७७ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.
या अपघाताबाबत नीलकमल बोटीचे मालक यांनी माहिती दिली आहे. या प्रवाशी बोटीत ८४ प्रवासी क्षमता आहे, पण त्यात १३० प्रवाशी नेले जाऊ शकतात. जेव्हा हा अपघात घडला तेव्हा बोटीत ८० प्रवाशी असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याचंही त्यांनी सांगितलं.