Mumbai News: मुंबतील गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात एक प्रवासी बोट उलटली असून यावेळी अनेक प्रवासी बोटीत होते. त्यांना वाचवण्यासाठी इतर बोटींनी मदतीला धावल्या आहेत.
या घटनेबाबत बोटीच्या मालकाने प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, प्रवाशांना घेऊन ही बोट एलिफंटा लेण्यांकडे जात होती. तेव्हा एका स्पीड बोटीने नीलकमल फेरीबोटला धडक दिली. या अपघातानंतर प्रवासी बोट उलटली. या बोटीची क्षमता १३० प्रवाशांची होती आणि अपघातावेळी बोटीत ८० प्रवासी होते.
या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर येत आहे. ज्यात प्रवासी बोटीला एका स्पीड बोटीने धडक दिली त्यानंतर प्रवासी बोट नीलकमल नावाची बोट उलटली. दरम्यान ज्या प्रवाशांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्पीड बोटीने आदी नीलकमलला एक राऊड मारला आणि त्यानंतर थोडी लांब जाऊन पुन्हा परत येताना तिला थेट येऊन धडक दिली. हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
स्पीड बोटीने जेव्हा प्रवासी बोटीला धडक दिली तेव्हा त्याचा व्हिडिओ एका प्रवाशाने शूट केला. ही धडक इतकी जोरात होती की ज्यामुळे प्रवासी बोटीचे दोन तुकडे झाले. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी बोट उलटली असल्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर या अपघाताबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत माहिती दिली.
बचावकार्याला वेग देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबईत एलिफंटा परिसरात आज सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचावकार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर, रायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली. नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यंत्रणेला सांगितले.
एलिफंटाला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. त्याचबरोबर पोलिस उपआयुक्त (बंदरे) सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनीवरून संवाद साधत माहिती घेतली.