• Sun. Dec 29th, 2024
    कांदा दोन हजारांवर! आवक वाढल्याने दरांत मोठी घसरण; निर्यातशुल्क हटविल्यास मिळेल दिलासा

    Onion Price: केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या २० टक्के निर्यात शुल्कमुळे कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने कांद्यावरील निर्यात शुक्ल रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली.

    महाराष्ट्र टाइम्स
    onion export AI

    निफाड : नोव्हेंबरपर्यंत तेजीत असणाऱ्या कांद्याच्या दरांमध्ये खरीप हंगामातील नवीन कांद्याची आवक वाढल्यानंतर वेगाने घसरण सुरू झाली आहे. कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले २० टक्के शुल्क पूर्णत: रद्द केल्याशिवाय कांद्याच्या दरांना उठाव मिळणार नसल्याचे कांदा उत्पादक व व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यातच काही महिन्यांपूर्वी सहा हजारापर्यंत गेलेले कांद्याचे दर आता दोन हजार रुपयांपेक्षा कमी होत असल्याने उत्पादकांची धास्ती वाढली आहे.
    Chhagan Bhujbal: मी कोणाच्या हातातलं खेळणं नाही; छगन भुजबळ यांचा पक्षनेतृत्वावर हल्लाबोल
    कांद्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत समित्यांच्या आवारातही कांद्याची आवक वाढली आहे. देशातही गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील कांद्याची आवक वाढली आहे. या राज्यांमधून महाराष्ट्रातही कांद्याच्या आवकेत सातत्याने वाढ होत आहे. कांद्याचे दर सुमारे साडेतीन हजारांवर आले असताना अधिक घसरण होण्याअगोदरच कांदा बाजारात आणण्याच्या हेतूनेही मोठ्या प्रमाणावर आवक वाढली. आठवडा ते पंधरवड्यापूर्वी लाल कांद्याचे दर सुमारे ३५०० ते ४ हजारांवर होते. तर उन्हाळ कांदा कमी पुरवठ्यामुळे सातत्याने पाच ते साडेपाच हजार रुपयांवर होता. दरम्यान, डिसेंबरपासून नवीन कांद्याची आवक वाढल्याने आता लाल कांदा सरासरी दोन हजारांपर्यंत उतरला आहे.

    ‘गेल्या महिन्यात कांद्याचे दर तेजीत राहीले असले तरीही उत्पादकांकडे जास्त कांदा उपलब्ध नव्हता. त्या अगोदर अवकाळी पावसाचाही फटका उत्पादकांना बसून नुकसान पदरात पडले. त्यामुळे कांद्याच्या दरवाढीचा फारसा फायदा उत्पादकांना झालेला नाही. आताही दरात घसरण अशीच सुरू राहिल्यास उत्पादन खर्चदेखील वसूल होणार नाही’, अशी भीती कांदा उत्पादक पवन घुमरे यांनी व्यक्त केली.
    Uddhav Thackeray: मंत्र्यांप्रमाणे मुख्यमंत्रीही अडीच वर्षांनी बदलणार का? उद्धव ठाकरेंचा महायुतीला सवाल
    आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण
    आंतरराष्ट्रीय बाजारात अफगाणिस्तान व पाकिस्तानचा कांदा भारताच्या तुलनेत स्वस्त आहे. सद्यस्थितीत या बाजारात पाकिस्तानातूनही कांद्याची सातत्याने आवक वाढते आहे. आखाती देशांसह बांगलादेशातही कमी दरामुळे पाकिस्तानच्या कांद्याला प्राधान्य मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकण्यासह देशांतर्गत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी सरकारने कांद्याचे २० टक्के निर्यातशुल्क त्वरीत हटवावे, हे शुल्क हटविले गेल्यास कांद्याचे दर वाढून उत्पादकांना फायदा होईल, अशी आशा उत्पादक पंढरीनाथ मोरे यांनी व्यक्त केली.
    पाटील कुठे गेले? राज्यपाल कागद घेऊन रेडी, नवे मंत्री स्टेजवर दिसेनात, शोधाशोधीनंतर समजलं…
    इतर राज्यांतूनही आवक
    महाराष्ट्रामध्ये नाशिकसह पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर येथे आवक वाढते आहे. परिणामी, कांद्याच्या दरांमध्ये घसरण होत आहे. दिवाळीच्या सुमारास अवकाळीच्या तडाख्याने कांद्याचे मोठे नुकसान होत प्रतवारीत घसरण झाली होती. राज्यात सध्या गुजरात, मध्य प्रदेश व राजस्थानमधून कांद्याची मोठी आवक होते आहे. गुजरातमधील भावनगर, महूवा, गोंडल व मध्य प्रदेशातील सेंधवामधून मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे.
    Ambadas Danve: राज्यपालांचे अभिभाषण म्हणजे गुलाबी स्वप्न; विरोधी पक्षनेते दानवेंची सरकारवर टीका
    कांद्याच्या दरात १४०० रुपयांची घसरण
    निफाड :
    केंद्र सरकारने कांद्यावर लावलेल्या २० टक्के निर्यात शुल्कमुळे कांदा दरात मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या वतीने कांद्यावरील निर्यात शुक्ल रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी, अशी मागणी निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली. सद्यस्थितीत उन्हाळ कांदा संपलेला असून, नवा लाल कांदा राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आलेला आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीशी झगडत कांद्याचे उत्पादन घेतले आहे. यातील बराच कांदा अवेळी पाऊस व बदलत्या हवामानानुसार खराब झाला असून, चांगल्या कांद्यास बाजार समितीमध्ये कांद्याच्या उत्पादन खर्चावर आधारीत बाजार भाव मिळणे गरजेचे असताना दरांत दिवसेंदिवस घसरण होत आहे. कांद्यावर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क रद्द करणे गरजेचे असून, त्यामुळे कांद्याचे दर टिकून राहतील व उत्पादकांना चांगला दर मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *