Legislative Council Chairman Election: राज्यपालांनी सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १९ डिसेंबर २०२४ हा दिवस निश्चित केला आहे. महायुतीकडून विधानपरिषद आमदार राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, महायुतीकडून विधानपरिषद आमदार राम शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप पक्षाकडून तशी घोषणा करण्यात आली आहे. उद्या बुधवार सकाळी १० वाजता अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यांनंतर अर्जाची छाननी करण्यात येणार असून गुरुवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. तर पक्षाने आपली उमेदवारी घोषित केल्याने आमदार राम शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींसोबतच प्रदेश नेतृत्वाचेही आभार मानले आहेत.
‘महाराष्ट्र विधानपरिषद सभापती निवडणूकीसाठी माझी उमेदवारी घोषित केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब, भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, एनडीएचे आणि महायुतीचे आणि सर्व नेते यांचे मी मनापासून आभार मानतो’