• Sat. Dec 28th, 2024
    आंबेडकरी चळवळीचे धारदार नेतृत्व हरपले, विजय वाकोडेंचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन

    Ambedkar Movement activist Vijay Vakode Passed Away : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे.

    Lipi

    धनाजी चव्हाण, परभणी : भारतीय रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील नेतृत्व विजय वाकोडे यांचे सोमवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत पोकळी निर्माण झाली आहे.

    परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीच्या काचेची तोडफोड करीत संविधानाचा अवमान केल्याची घटना नुकताच घडली आहे. घटना घडताच विजय वाकोडे यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तेथील स्फोटक स्थिती लक्षात घेता त्यांनी संयमाची भूमिका घेतली होती. दुसर्‍या दिवशीसुद्धा या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या शांततापू्र्ण बंदच्या आंदोलनात त्यांची कळीची भूमिका राहिली. तर सोमवारी दिवसभर पुकारलेल्या राजव्यापी बंदच्या दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होत वाकोडे यांनी न्यायालयनीय चौकशी करावी अशी मागणी केली.
    जॉर्जियातील रेस्टॉरंटमध्ये आढळले ११ भारतीयांचे मृतदेह, मृत्यूचे कारण जाणून बसेल धक्का
    दरम्यान सोमवारी सायंकाळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेत देखील त्यांनी सहभाग नोंदवला होता. तेथून घरी परतत असताना प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने कार्यकर्त्याच्या मदतीने वाकोडे यांनी एका खाजगी रुग्णालयात धाव घेतली. परंतु उपचारादरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. दरम्यान, वाकोडे यांच्या निधनाच्या वृत्ताने आंबेडकरी चळवळीसह सर्व क्षेत्रातील नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.

    परिवर्तनवादी चळवळीतील शिलेदार

    गेल्या चार दशकांपासून आंबेडकरी चळवळीतील एक महत्त्वाचे नाव म्हणून विजय वाकोडे संपूर्ण मराठवाडाच नव्हे तर मराठवाड्याबाहेरही परिचित होते. पँथरच्या चळवळीतून धारदार असे नेतृत्व म्हणून ते पुढे आले. त्याकाळी सामाजिक विषमतेच्या सर्व आंदोलनांमध्ये ते सहभागी होते. दलित पँथरनंतर रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून त्यांनी आपले सामाजिक लढ्याचे कार्य चालू ठेवले. लोकनेते या नावाने ते सार्वजनिक जीवनात परिचित होते तर प्रेमाने ‘बाबा’ हे संबोधन त्यांना मिळाले होते. आज सोमवारी परभणीतील पार पडलेल्या निदर्शने व आंदोलनात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. परंतु अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने परिवर्तनवादी चळवळीतील एक शिलेदार हरपला आहे.

    विजय वाकोडे मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. गेल्या आठवड्यात आजारातून बरे झाल्यानंतर ते सामाजिक कार्यात सक्रीय झाले होते. परभणीतील संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणानंतर पुकारलेल्या बंद आंदोलनाचे नेतृत्व त्यांनीच केले होते.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed