Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम16 Dec 2024, 11:39 pm
२८ फेब्रुवारी २००३…पुण्यातील टिळक रस्त्यावर एक धक्कादायक घडना घडली. भाजपचे नगरसेवक सतीश मिसाळ यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु १३ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. हे सतीश मिसाळ म्हणजे भाजपच्या नवनिर्वाचित मंत्री माधुरी मिसाळ यांचे पती. माधुरी मिसाळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा मंत्रिपदापर्यंतचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. त्यांच्याच संघर्षाची ही कहाणी…