Pen Dadar Police Station Female Police Officer Shot: जखमी महिला पोलीस कर्मचारीला तातडीने उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आले. प्रथम उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
हायलाइट्स:
- रिव्हॉल्वरची गोळी लागल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी
- पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाण्यात घडली घटना
- अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल
भरधाव BMW थेट गॅरेजमध्ये घुसली, तिघे कारखाली
दरम्यान, काही दिवसापूर्वी एक भीषण अपघात झाला होता. लिबाग तालुक्यातील अलिबाग रेवस मार्गावर रविवारी, ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास चोंढीजवळ डे-फार्म येथील वळणावर भीषण अपघात झाला. अलिशान लक्झरी बीएमडब्ल्यू कार मालक स्वतः चुकीच्या बाजूला जाऊन बेदरकारपणे रस्त्याच्या कडेला असलेल्या दुचाकी गॅरेजच्या शेडमध्ये जोरदार धडक दिली. या धडकेत गॅरेजमध्ये दुचाकी दुरुस्तीसाठी आलेले दोन ग्राहक आणि गॅरेज मालक गंभीर जखमी झाले. यावेळी घडलेल्या भयानक अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मांडवा सागरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ गंभीर जखमी झालेल्या तिघांना इतर वाहन चालकांच्या आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं. या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार देताना सांगितलं की, चोंढी येथील संदीप विलास गायकवाड, वय ४१ हा आपल्या बीएमडब्ल्यू कार क्र. एम.एच. ०६ बीई २०० ने रविवारी संध्याकाळी अलिबागकडून रेवसकडे जात होता.