Sangli Tasgaon Waifale Crime News: आता या हल्ल्याचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. वायफळे बसस्थानक चौकातील सीसीटीव्हीमध्ये हा हल्ला कैद झाला आहे. सीसीटीव्हीमधील फुटेजवरून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
हायलाइट्स:
- तासगाव तालुक्यातील वायफळेत सहा जणांवर हल्ला
- पूर्ववैमनस्यातून धारधार शस्त्राने हल्ला
- सीसीटीव्ही फुटेज समोर
ठाकरे गटाच्या महाआरतीआधीच दादरच्या हनुमान मंदिराला आलेल्या नोटिशीला स्थगिती, लोढांच्या हस्ते आरती
याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वायफळे येथील फाळके कुटुंबीयांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून किरकोळ कारणांवरून वाद सुरू आहेत. याच वादातून या कुटुंबांमध्ये बऱ्याच वेळा भांडणं झाली होती. भांडणाचं पर्यावसन अनेक वेळा मारामारीत झालं होतं. दोन्ही कुटुंबातून एकमेकांवर यापूर्वीही धारदार शस्त्राने हल्ले झाले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
गेल्या काही वर्षात दोन्ही कुटुंबांमधील हा वाद चिघळत चालला होता. एकमेकांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. यातूनच वादावादीचा प्रकार घडत होता. हा वाद मिटवण्याचाही बऱ्याच वेळा प्रयत्न झाला. मात्र तो अयशस्वी ठरला. त्यामुळे दोन्ही कुटुंबांमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला होता. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान दहा ते बारा जणांची टोळकी दुचाकीवरून वायफळे येथील बसस्थानक चौकात आले. त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या ओंकार उर्फ रोहित संजय फाळके याच्यावर या टोळक्याने हल्ला चढवला. त्याच्यासोबत आदित्य आणि आशिष साठे ही त्याच्या मामांची दोन मुलेही होती. या दोघांवरही धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला.