• Thu. Dec 26th, 2024

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण A to Z, त्या स्टेटसमुळे हालहाल करून मारलं? थरकाप उडणारे हत्याकांड

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण A to Z, त्या स्टेटसमुळे हालहाल करून मारलं? थरकाप उडणारे हत्याकांड

    Santosh Deshmukh Murder Full Story in Marathi : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. अंगाचा थरकाप उडेल असा मृत्यू संतोष देशमुख यांच्या नशिबी आला. हल्लेखोरांनी त्यांची बोटं मोडली, पाठ काळनिळी होईपर्यंत मारहाण, छातीवर उड्या मारल्याची धक्कादायक खुलासा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. या हत्येमागचं कारण आणि पोलीस यंत्रणेने केलेला हलगर्जीपणाही त्यांनी उजेडात आणला.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    संतोष देशमुख हत्या प्रकरण

    बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सरपंचांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून चार आरोपी फरार आहेत. सरपंचाची करण्यात आलेली हत्या साधी नव्हती, मयत सरपंच संतोष देशमुख यांचे लायटरने डोळे जाळले, संपूर्ण पाठ काळीनिळी झाली होती. शेवटला जीव जात नव्हता म्हणून त्यांच्या छातीवर उड्या मारण्यात आल्याचा धक्कदायक खुलासा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ‘मुंबई तक’सोबत बोलताना केला आहे. संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? हत्यामागे कोण आहेत? धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तियाचं नाव का समोर येत आहे याबाबत सविस्तरपणे धस यांनी सांगितलं आहे.

    सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण नेमकं काय? सुरेश धस यांनी सांगितला घटनाक्रम

    संतोष देशमुख हा चांगला सरपंच राहिलेला होता. मी स्वत: गावात जाऊन आलो, त्याची संपूर्ण माहिती घेतली. मुळात संतोष हा त्याच्या आजोबांकडे राहत होता. म्हणजेच मस्साजोगमध्ये त्याच्या मामाकडे लहानपणापासून होता. त्यांच्या आईला बार्शीकडे दिलं होतं. तिकडे त्यांना पाचच एकर जमीन होती. त्यानंतर संतोषच्या आजोबांनी त्यांना माघारी आणलं. तेव्हापासून संतोष लहानाचा तिथेच मोठा झाला. पहिल्यांदा संतोष हा जनतेतून सरपंच झाला. नंतर मविआचे सरकार आल्यावर त्यांनी हा कायदा बदलला. देवेंद्र फडणवीसांनी जो जनतेतून सरपंच आल्यावर कायदा बनवला होता. तो उद्धव ठाकरे यांच्या सरकार आल्यावर बदलला होता. तेव्हा सदस्यांमधूनही संतोष हा सरपंच झाला. परत देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावरल पुन्हा कायदा बदलत जनतेतून सरपंच निवडण्याचा केला. त्यावेळी जनतेतूनही संतोष पुन्हा एकदा सरपंच झाला. मस्साजोग गावाने संतोषच्या कार्यकालामध्ये स्वच्छता, झाडे लावण्याचं दीड कोटी रूपयांचं बक्षीस मिळवलं आहे. यादरम्यान आमच्याकडे बीड जिल्ह्यामध्ये अवादा कंपनी, आष्टी आणि पाटोदा तालुक्यामध्ये रिनिव्ह्यू, ओटो पॉवर कंपनी आली. अशा वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्यामध्ये विंड एनर्जी म्हणजे पवनचक्की, चांगली हवा असल्यामुळे या कंपन्या आल्या. आष्टी तालुक्यामध्ये २०११-१२ ला आल्या आहेत. पण आमच्याकडे कधी असा काही प्रकार घडला नाही. पण केज तालुका आहे जो परळीजवळ असल्याचं धस म्हणाले.
    Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या अपहरणाआधीचा थरारक व्हिडीओ, चारच मिनिटात… CCTV फुटेज समोर

    ६ डिसेंबरला काय घडलं?

    ज्या गावात जागा गोडाऊन करता येईल. अशाच प्रकारे अवादा कंपनीने ३० एकर जमीन भाड्याने घेत तिथे कम्पाऊंड मारलं. आता एका रात्रीत ऑफिस केलं जातं. संतोष देशमुखची हत्या सोमवारी झाली, मात्र त्याआधी तीन दिवस शुक्रवारी आरोपींमधील सुदर्शन घुले, प्रतिक घुले काही जणांना घेऊन अवादा कंपनीच्या गेटवर गेले. त्या कंपनीच्या गेटवर त्याच गावातील दलित समाजाचा मुलगा वॉचमन होता. त्याला दमदाटी करत आरोपींनी आम्हाला आतमध्ये जायचंय सांगितलं. मात्र त्याने मला आतमध्ये फोन लावून विचारून सांगतो असं सांगितलं. तेव्हा तो फोन लावायला गेल्यावर त्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. आजूबाजूचे वॉचमनही तिथे पळत आले. या मारहाणीबाबतची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यावेळी सरपंच संतोषही गावात होता, तेव्हा सरपंचासह गावातील काहीजण आणि मुलगा दलित असल्यामुळे दलित बांधवही त्याच्यासोबत कंपनीजवळ गेले. तेव्हा त्या ठिकाणी बाचाबाची झाली, दोन्ही गटामध्ये मारहाण झाली. त्यावेळी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार करा असं सांगितलं. तेव्हा कंपनीचे अधिकार वॉचमन तक्रार करायला गेले, टाकळी गावापासून तीन किलोमीटर केजचे पोलीस स्टेशन आहे. वॉचमनने त्यावेळी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायची असल्याचं सांगितलं. तर सरपंचही त्यावेळी फिर्यादी म्हणून उपस्थित होते. एकाचवेळी तीन फिर्यादी होते पण अधिकारी महाजन यांनी त्यांची फिर्याद काही घेतली नाही. त्यांना कोणाचा फोन गेला मला माहिती नाही, असं सुरेश धस यांनी सांगितलं.

    पोलीस आरोपींसोबत फिरत होते- सुरेश धस

    अजित पवारांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष विष्णु चाटे तिथे आले. विष्णु चाटे हे वाल्मिक कराड यांचे नातेवाईकही लागतात. त्यावेळी कोणाचीही फिर्याद घेतली नाही, जर शुक्रवारी यापैकी एक फिर्याद घेतली असती आणि या मुलांना पाबंद केलं असतं किंवा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असता तर ती मुलं फरार झाली असती आणि सोमवारी संतोष यांची हत्या झाली नसती. ही चूक ज्या पोलिसांनी केली त्यांचा प्रचंड राग लोकांना आला आहे. पाटील नावाचे जे अधिकारी आहेत ते आरोपी मुलांसोबत शनिवारी आणि रविवारी चहापाणी करत फिरत होते. त्यामुळे या आरोपींचे मन बळवणार नाहीत का, या घटनेमध्ये पोलिसांचीही चौकशी झालू पाहिजे.

    सोमवारी हत्येदिवशीचा सविस्तर घटनाक्रम

    सोमवारी संतोष देशमुख हे आपल्या आत्याच्या मुलासह केजकडून मस्साजोगकडे येत होते. गाडीमध्ये संतोष डाव्या बाजूला बसले होते तर आत्याचा मुलगा गाडी चालवत होता. तिथे एक टोलनाका असून तो अद्याप सुरू झालेला नाही. टोलनाक्याजवळ एक गाडी संतोष यांच्या गाडीच्या पुढून स्कॉर्पिओ लावली गेली आणि पाठीमागून एक गाडी लावली गेली. गाडीतून सहाजण काहीजण उतरले आणि हातात हॉकी स्टिक, रॉड, काठ्यांनी मारायला सुरूवात केली. संतोषच्या आत्याचा मुलगा बसलेला तिथे मोठा दगड मारला. संपूर्ण गाडी फोडली, संतोषला बाहेर काढलं मारलं आणि गाडीत घातलं. तिथून संतोषच्या आत्याचा मुलगा पोलीस स्टेशनला गेला आणि पंधरा मिनिटात पोलीस स्टेशनला गेला. त्यावेळ सगळ्यांनी मागणी केली की आमच्या माणसाला उचलून नेलं हे फिर्याद घ्या, पण फिर्याद घेणारा माणूस ४० मिनिट आला नाही. आल्यावर तीन तास झाले तरी त्याने फिर्याद घेतलीच नाही. यादरम्यान संतोषचा चुलत भाऊ आणि विष्णू चाटे यांचे ३६ कॉल झालेत. यामधील ३५ कॉल हे संतोषच्या भावाने विष्णू चाटे यांना लावले आहेत. प्रत्येक फोनला ते दहा मिनिटं थांबा त्यांना बोलावून घेतो केस काही करू नका असं सांगत होते, तोपर्यंत इकडचे लोक बोलले केसचं नंतर पाहू पण तुम्ही त्यांना बोलावून घ्या. पोलिसांचं त्यावेळी पहिलं काम हे होतं की विष्णू चाटे याला पकडून तुझ्या पोरांना सांग आणि संतोषला इकडे घेऊन या. आपण समोरासमोर बसू आणि तडजोड करू आणि विषय संपवू, असं धस म्हणाले.

    WWR प्रमाणे देशमुखांच्या गुडघ्यांनी छातीवर बसला

    ६ डिसेंबर शुक्रवारी झालेल्या हाणामारीमध्ये आरोपींमधील प्रतिक घुले याच्या तोंडात कोणीतरी मारली होती. याचा व्हिडीओ कोणीतरी पोरांनी व्हायरल केला. त्या गोष्टीचा राग त्याच्या डोक्यात होता. आमचा फोटो व्हायरल केला. त्यामुळे त्याचा इगो दुखावला गेला. तिथले लोक म्हणत होते की सरपंचाला उघडनागडं करू याचाही आम्ही रील करू, उचलून नेलं होतं तर तसं करायचं. पण तसं काही केलं गेलं नाही. विष्णू चाटेचं काम होतं की, तुम्ही त्याला गाडीत उचलून नेलंय कर मारू नका असं पोरांना सांगा. आरोपी संतोष देशमुख यांना तीन तास मारत होते, पोलीस स्टेशनपासून पाच किलोमीटर रेडियसमध्ये फिरवत होते. पोलिसांनी या गाड्या शोधायला लावल्य पाहिजे होत्या. दैठणा म्हणून एक गाव आहे त्या शिवारामध्ये फेकून दिलं. विष्णू चाटेला सांगण्यात आलं की संतोष संपला त्यानंतर तो फोन बंद करून निघून गेला. जर शुक्रवारी फिर्याद घेतली असती तर संतोषची हत्या झाली नसती. हे मारणारे पोरं आहेत ते कशानेही मारत राहिले त्याला, एक इंचही जागा त्याच्या पाठिवर राहिली नाही. समोर वायरने मारलं आहे, फायटरने मारलंय, लायटरने डोळे जाळले. त्यांना काय डोळे काढायचे होते का? त्याने एवढं काय केलं होतं? कदाचित धराधरीमध्ये त्याने एक चापट मारली, त्याने तुमचा इगो दुखावला होता तर केजमध्ये लोकांसमोर १०० चापटा मारायच्या होत्या ना? माझा म्हणणं असं आहे शुक्रवारी या लोकांची फिर्याद कोणाच्या बोलण्यावरुन फिर्याद घेतली नाही. या लोकांचा आका कोण? आणि या लोकांचा आका कोण हे शोधलं पाहिजे, असं सुरेश धस म्हणाले. पकडण्यात आलेला आरोपी प्रतिक घुले याने कबुली दिली की, संतोष देशमुख यांचा जीव जात नव्हता, मग मी WWE सारखे गुडघे उचलून देशमुख यांच्या छातीवर बसला. जर बरगड्या मोडून छातीत घुसल्या तर जागेवरच संपणार ना ही माहिती पोलिसांनी दिली असल्याची धस यांनी सांगितलं.

    दरम्यान, अवादा कंपनीने ऑनलाईन तक्रार करायला हवी होती. अवादा कंपनीने हत्या झाल्यावर तक्रार दिली. आम्हाला खंडणी मागण्यात आली होती, ती वाल्मिक कराड याचं नाव त्यामध्ये समोर आलं आहे. आमच्या जिल्ह्यात खंडणीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. कंपनीनने २ कोटींची खंडणी मागितल्याची फिर्याद दिली. हे आकडे बघा, मी पाच टर्म आमदार आहे पण एकावेळी १ कोटी पाहिले नाहीत. माझा एक प्रश्न आहे की शुक्रवारी कोणाच्या फोनवरून तक्रार घेतली नाही, असा सवाल आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed