• Sat. Dec 28th, 2024

    खुटवडनगर परिसरातील ‘हे’ रस्ते बंद! काँक्रिटीकरणासाठी २ वर्षे वाहतूकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

    खुटवडनगर परिसरातील ‘हे’ रस्ते बंद! काँक्रिटीकरणासाठी २ वर्षे वाहतूकीत मोठे बदल, पर्यायी मार्ग कोणते?

    Nashik Traffic Change: खुटवडनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास प्रारंभ होणार आहे. या रस्त्याची चार टप्प्यांत दुरुस्ती होणार असून, त्यासाठी दोन वर्षांकरिता येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे

    महाराष्ट्र टाइम्स
    nashik traffic change

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: महापालिकेच्या सातपूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खुटवडनगर रस्त्याच्या काँक्रिटीकरणास प्रारंभ होणार आहे. या रस्त्याची चार टप्प्यांत दुरुस्ती होणार असून, त्यासाठी दोन वर्षांकरिता येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

    त्यानुसारसप्टेंबर २०२६ पर्यंत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. यासंदर्भात नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अधिसूचना जारी केली आहे. यासह पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.

    ■ एक हजार ३० मीटर लांबीचा रस्ता
    ■ दि. १४ डिसेंबर २०२४ ते १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत काम
    ■ कामावेळी शंभर मीटरपर्यंत ‘नो पार्किंग झोन’
    ■ रस्ते काँक्रिटीकरणावेळी बॅरिकेडिंग अनिवार्य प्रवेश बंद, काम सुरू, पर्यायी मार्ग, दिशादर्शक फलक आवश्यक
    ■ वाहतूक नियंत्रणासाठी ‘वॉर्डन’ नेमावेत
    काँग्रेसमध्ये राजीनामासत्र? पराभवानंतर चेन्नितला, पटोले पद सोडण्याच्या तयारीत
    … असा राहणार पर्यायी मार्ग
    ■ आयटीआय सिग्नलमार्गे सरस्वतीनगर-हेगडेवारनगर-दत्त मंदिर चौक- त्रिमूर्ती चौक-कामटवाडेमार्गे माऊली लॉन्स
    ■ आयटीआय सिग्नलमार्गे शिवशक्तीनगर- मोगलनगर-कामटवाडेमार्गे इतरत्र

    कामाचा टप्पा…
    १) आयटीआय पूल ते सीटू भवन कार्यालय
    २) सीटू भवन कार्यालय ते म्हसोबा मंदिर
    ३) म्हसोबा मंदिर ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर
    ४) दक्षिणमुखी हनुमान मंदिर ते माऊली लॉन्स
    मंत्रिपदाची लॉटरी कोणाला? विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी; फरांदे, हिरे, ढिकले, आहेरांच्या नावांची चर्चा
    काम खोळंबल्याने गैरसोय हेडगेवारनगरमधून आयटीआय पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून खोदकाम केलेले आहे. दुरुस्तीसाठी खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना गल्लीबोळांतून घर गाठावे लागत आहे. त्यातच आता खुटवडनगर रस्त्यावरील कामाला सुरुवात होणार असल्याने वाहतूक वळविण्यात येणार आहे. परिणामी, हेडगेवार चौक, त्रिमूर्ती चौक, शिवशक्तीनगर येथे कोंडीची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीचे खोळंबलेले काम त्वरित पूर्ण करण्यासह अतिक्रमण निर्मूलनाची मागणी नागरिक करीत आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed