• Sat. Dec 28th, 2024
    ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ गाण्याच्या गायकावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

    Mala Aamdar Zalyasarkh Vatatay Singer: ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्याचे गायक संकल्प अजाबराव गोळे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी कुटुंबीयांसह गुन्हा दाखल झाला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    दीपक पडकर, बारामती : ‘मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्याचे गायक संकल्प अजाबराव गोळे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. गोळे यांच्या पत्नी मिनल संकल्प गोळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरुन याप्रकरणी पती संकल्प गोळे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय आई शोभा अजाबराव गोळे, पिता अजाबराव मारुती गोळे, बहीण समिक्षा अजाबराव गोळे, दिक्षिता स्वप्निल जाधव यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिनल गोळे यांनी तक्रारीत म्हटले की, मिनल व संकल्प यांचा विवाह ५ फेब्रुवारी २०२३ला झाला. लग्नानंतर एक महिना संसार सुरळीत होता. परंतु त्यानंतर पती संकल्प हे दारु पिऊन तिच्यावर वारंवार संशय घेऊ लागले. तु काम व्यवस्थित करत नाही, तु कोणासोबतही चॅटींग करते, तुला घरकाम येत नाही. त तुझे बारामतीतील मेडिकल शॉप बंद करून पुणे येथे सुरु कर, अन्यथा तुला नांदवणार नाही, अशी धमकीही त्यांनी दिली. तुला नांदवायचे नाही, तु मला घटस्फोट दे, असे म्हणत तिला मारहाण आणि दमदाटीही करत होते.
    Satish Wagh Murder: सतीश वाघ हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार कोण? पोलिसांकडून कोडे सुटेना; जवळच्याच माणसाने केला घात
    यासोबतच सासूने देखील आपला छळ केल्याने तक्रारीत नमूद केले. ‘तु मला उलट बोलतेस, तुला नांदवायचे नाही. तर समिक्षाच्या लग्नासाठी दहा तोळे दागिने माहेरहून आण अशी मागणीही सासूने केली. सासरे यांनीही मेडिकल शॉप पुण्यात सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्यास सांगितले. त्यासाठी शारिरिक व मानसिक छळही केला. नणंद समिक्षा व दिक्षिता यांनी देखील मला सतत शिविगाळ आणि दमदाटी केली. लग्नावेळी घातलेले दागिने सासरच्या मंडळींनी काढून घेत मला राहत्या घरातून हाकलून दिले, असा आरोप मिना गोळे यांनी केला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed