• Fri. Sep 4th, 2026

अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा NCPAसोबत ऐतिहासिक वेतनकरार संपन्न! रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कामगारांना वेतनवाढ

मुंबई : भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने काल गुरुवार दिनांक ०३ सप्टेंबर २०२६ रोजी नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA) सोबत कामगारांच्या हिताचा एक ऐतिहासिक वेतनवाढ करार यशस्वीपणे संपन्न केला. हा महत्त्वपूर्ण करार भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.

या वेतनवाढ कराराची अंमलबजावणी ०१ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२८ या चार वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. या करारानुसार NCPA मधील सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा रु. ७,२५० इतकी भरीव वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी रु. ५०,००० बोनस मिळणार आहे, अशी माहिती रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. ते पुढे म्हणाले की, ‘हा करार NCPA व्यवस्थापन आणि कामगार संघटनेदरम्यान झालेला तिसरा वेतनवाढ करार असून, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने आपल्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर कामगारांच्या वेतनवाढीसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना मिळालेले हे मोठे यश आहे’.

Nagpur Crime : मध्यरात्री तब्येत बिघडली, रुग्णालयात पोहोचण्याआधीच प्राण सोडला, नवऱ्याचा भलताच बनाव; बायकोच्या मृत्यूचं गूढ उकललं
यापूर्वी NCPA मध्ये मुंबई लेबर युनियन ही बहुसंख्य कामगारांची संघटना होती. मात्र, अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम करत मुंबई लेबर युनियचे संपूर्ण सदस्यत्वअखिल भारतीय कामगार कर्मचारी संघामध्ये आणले. त्यानंतर औद्योगिक न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेतून अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ ही NCPA मधील सर्वात मोठी आणि एकमेव सर्वात प्रमाणित कामगार संघटना म्हणून पुढे आली आहे. या संघटनात्मक विजयामुळे NCPA मधील कामगारांच्या हक्कांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठविण्याचे बळ अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाला प्राप्त झाले आहे.

या ऐतिहासिक वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरी समारंभास NCPA च्या वतीने अध्यक्ष श्री. संटूक, संचालक श्री. फ्रेडी तलाठी, तांत्रिक संचालक श्री. काळे तसेच मानव संसाधन विभागाचे महाव्यवस्थापक श्री. व्हिन्सेंट डिसूझा उपस्थित होते. तसेच अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या वतीने सरचिटणीस श्री. सुहास माटे, उपाध्यक्ष श्री. प्रशांत वर्तक तसेच संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य या ऐतिहासिक वेतनवाढ कराराच्या स्वाक्षरी प्रक्रियेत सहभागी होते.

Maharashtra TimesSolapur News : सोलापुरात 86 वर्षांच्या माजी नगरसेवकावर हल्ला, 25 वर्षांपूर्वीच्या वादाच्या रागातून आरोपीचं कृत्य
“कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या प्रयत्नांना मिळालेले हे यश म्हणजे एकजूट, संघटनात्मक ताकद आणि कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे. अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली NCPA मधील कामगारांना मिळालेली ही वेतनवाढ भविष्यातील अधिक चांगल्या सेवा-सुविधा आणि कामगार कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.” असं रविंद्र चव्हाण म्हणाले.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed