• Fri. Sep 4th, 2026

Vidyanand Bapat Parents Reaction : विद्यानंद हा पूर्वी नास्तिक नव्हता मात्र वातावरण, परिस्थितीनुसार तो आता नास्तिक झाला आहे, अशी प्रतिक्रिया विद्यानंद बापट यांचे वडील सुहास बापट यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना दिली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : गणेशोत्सवातील कर्णकर्कश ‘डीजे’च्या दणदणाटामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट हे मूळचे कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथील आहेत. पुण्यात झालेल्या हल्ल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांचे वडील सुहास कृष्णाजी बापट व आई या दोघांनीही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील नारायण पेठेत सध्या राहणारे विद्यानंद बापट हे मूळचे कोकणातील रत्नागिरी तालुक्यातील गोळप गावचे सुपुत्र आहेत. लहानपणापासूनच हुशार असलेल्या बापट यांना वाचनाची आवड आहे.

पूर्वी नास्तिक नव्हता

“आपला मुलगा विद्यानंदने मांडलेली भूमिका ही योग्यच आहे व आम्ही आई वडील म्हणून त्याला समर्थनच देतो. त्याला लहानपणापासूनच वाचनाची मोठी आवड आहे. विद्यानंदचे मराठी, संस्कृत, इंग्लिश या भाषांवर प्रभुत्व आहे. अर्थशास्त्र हा त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. इतकंच नाही तर विद्यानंद हा पूर्वी नास्तिक नव्हता मात्र वातावरण, परिस्थितीनुसार तो आता नास्तिक झाला आहे” अशी प्रतिक्रिया विद्यानंद बापट यांचे वडील सुहास बापट यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना दिली.

Maharashtra TimesNaldurg Killa News : रिक्षाचालक नवऱ्याच्या सांगण्यावरुन मुंबईतली नोकरी सोडली, विवाहितेचं नळदुर्गावर तीन लेकरांसह टोकाचं पाऊल, जुळ्या मुलींची जगण्याशी झुंज

घरात संस्कृत पठणाची परंपरा

सुहास बापट पुढे म्हणाले की, “माझे वडील म्हणजेच विद्यानंदचे आजोबा कृष्णाजी बापट हे दशग्रंथी ब्राह्मण होते. त्यामुळे आमच्या घरात संस्कृत पठणाची परंपरा आहे. इयत्ता नववीपर्यंत विद्यानंदचं शिक्षण पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्याचे शिक्षण रत्नागिरी येथील फाटक हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण रत्नागिरी येथील गोगटे कॉलेजमध्ये झाले. बीकॉममध्ये महाविद्यालयात विद्यानंद मेरिटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर चमकला होता, त्यानंतर त्याने एम.कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले, सीएची परीक्षा दिली” अशी माहिती विद्यानंद यांचे वडील सुहास बापट यांनी दिली.

पोलीस संरक्षण मिळावं

“आपला मुलगा आपल्यापासून जवळपास 400 किलोमीटर दूर आहे. त्याने घेतलेली डीजे विरोधातील भूमिका योग्य असून आपण त्याचं समर्थनच करतो, त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा आपण निषेध करतो” अशी प्रतिक्रिया सुहास बापट यांनी माध्यमांजवळ बोलताना दिली आहे.

Maharashtra TimesCrime News : मुलाच्या कोचने माझ्या नवऱ्याला संपवलं; महिलेने आई-वडिलांसह आयुष्य संपवलं, चिठ्ठीत मोठा उलगडा; बचावलेल्या चिमुरड्याने सगळं सांगितलंविद्यानंद यांच्या मातोश्री कल्पना बापट यांनीही सांगितलं की “मुलाने घेतलेली भूमिका ही वैचारिकदृष्ट्या योग्य आहे, मुद्दा बरोबरच आहे, तो मुद्दा पुढे यशस्वी व्हावा, या गणेशोत्सवात त्याची प्रचिती यावी, असं आमचं म्हणणं आहे. तुझ्या पाठीशी आम्ही आहोतच, तू बोलतो आहे तर समोरुनही बोलणं झालं पाहिजे, असा हल्ला होता कामा नये, तसेच त्याला आवश्यक ते पोलीस संरक्षण मिळाल्यास आम्हाला मोठा दिलासा मिळेल” अशी प्रतिक्रिया विद्यानंद बापट यांच्या आई वडिलांनी दिली आहे.