• Fri. Dec 27th, 2024
    बस अपघातानंतर चालक संजय मोरेने सर्वात आधी काय केलं? सीसीटीव्हीमध्ये कैद धक्कादायक प्रकार

    Kurla BEST Bus Accident CCTV Video : बस अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना उडवून कमानीला धडकली. त्यावेळी बसच्या बहुतांश खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे बसमधील प्रवाशांची धांदल उडाली

    Kurla Accident : बस अपघातानंतर चालक संजय मोरेने सर्वात आधी काय केलं? सीसीटीव्हीमध्ये कैद धक्कादायक प्रकार

    मुंबई : कुर्ला बेस्ट बस अपघातास नेमकं कोण कारणीभूत, याचा तपास सुरु आहे. आतापर्यंत अपघाताच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरांचे फूटेज समोर आल्याने घटनेवेळी बसचा वेग किती होता, याचा अंदाज येतो. मात्र बसच्या आतील सीसीटीव्हीचे फूटेज आता समोर आले आहे. यामध्ये अपघातानंतर चालक संजय मोरेही स्पष्टपणे दिसत आहे.

    सीसीटीव्हीमध्ये काय दिसतं?

    बस अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना उडवून कमानीला धडकली. त्यावेळी बसच्या बहुतांश खिडक्यांच्या काचा फुटल्या. त्यामुळे बसमधील प्रवाशांची धांदल उडाली. अनेक जणांनी फुटलेल्या खिडक्यांमधून उड्या घेत आपला जीव वाचवला. बस कंडक्टरही सर्व प्रवासी बाहेर पडत असल्याची खात्री बाळगत बाहेर पडला. तर चालक संजय मोरेनेही सर्वात आधी बसमधील आपली बॅग घेण्याचा प्रयत्न केला. मात्र खांबाला अडकल्यामुळे पहिल्या झटक्यात ती त्याच्या हाती आली नाही. तरी त्याने शिकस्त न सोडता, दोन बॅग उचलल्या आणि खिडकीतून बाहेर पडला, असे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

    सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    या भयावह अपघातास कारणीभूत असलेल्या बेस्टचा कंत्राटी चालक संजय मोरे याला पोलिसांनी सोमवारी रात्रीच अटक केली होती. पोलिसांनी त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. चौकशीत त्याने इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नसल्याचा जबाब नोंदवला. सोमवारच्या दुर्घटनेपूर्वी बेस्ट सेवेत रुजू होण्यापूर्वी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा केवळ नऊ दिवसांचा अनुभव घेतल्याचेही त्याने सांगितले.
    Kurla Accident : पापा, भाभीका इंतकाल हो गया… कुर्ला बस अपघातात होत्याचं नव्हतं, हसत्या खेळत्या घरांवर दुःखाचा डोंगर

    चालकाने जबाब काय दिला?

    एक डिसेंबरपासूनच इलेक्ट्रिक बस चालवल्याचे सांगतानाच त्यापूर्वी मिनी बस चालवत असल्याचेही तो म्हणाले. अनुभव नसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याची कबुली त्याने दिली. मोरे हा चौकशीदरम्यान मानसिकदृष्ट्या सक्षम असून वैद्यकीय चाचणीत त्याने मद्यपान केले नसल्याचे स्पष्ट झाले.

    ‘बेस्ट’च्या नियमित बस चालकांना दीड महिन्यांचे प्रशिक्षण दिल्यानंतरच कर्तव्यावर रुजू करुन घेतले जात असताना भाडेतत्त्वावर काम करणाऱ्या बस चालकाला मात्र मिनी बसच्या अनुभवानंतर अत्यंत तुटपुंज्या अनुभवावर मोठ्या बसचे स्टिअरिंग हाती सोपवण्यात आले होते. भीषण अपघातानंतर हा गंभीर मुद्दा पुढे आला आहे.
    Kurla Bus Accident : ‘माणुसकी’चाही चिरडून मृत्यू! गाडीखाली बॉडी अडकलेली, त्याने हातातले दागिने काढून घेतले
    सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास ‘बेस्ट’ बसमार्ग क्रमांक ए ३३२ ही बस कुर्ला बसस्थानक पश्चिम येथून अंधेरी बस स्थानक पूर्वेकडे निघाली. मात्र, बस स्थानकातून सुटताच या बेफाम बसने ३० ते ४० वाहनांसह पादचाऱ्यांना धडक दिली. या भीषण अपघातातील मृतांची संख्या ७ झाली असून, ४२ जण जखमी झाले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed