Pune Crime Satish Wagh Murdered : पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामांचं अपहरण केल्याचं समोर आलं होतं. अपहरणाच्या काही तासांनंतर त्यांची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी सकाळी काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेले असताना झालं अपहरण
सतीश वाघ हे सोमवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. त्यावेळी एका कारमधून आलेल्या काही लोकांनी त्यांना जबरदस्ती गाडीत बसवलं. तेव्हा कारमध्ये त्यांना कोंबत असताना वाघ ‘वाचवा वाचवा’ असं ओरडले, त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने मागे फिरून पाहिलं. त्या व्यक्तीने कारचा पाठलागही केला. मात्र, कार वेगाने सोलापूर रस्त्याच्या दिशेने गेली.
Pune Crime : भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या अपहरण झालेल्या मामाची हत्या, यवत गावच्या हद्दीत मृतदेह
प्रत्यक्षदर्शींनी घडला प्रकार सतीश वाघ यांच्या घरी सांगितला
सतीश वाघ यांचं अपहरण करुन त्यांना कारमधून घेऊन गेल्याचं काही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं होतं. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी तात्काळ सतीश वाघ त्यांच्या घरी जाऊन झालेला प्रकार सांगितला. ही घटना सोमवारी सकाळी ६ वाजून १५ मिनिटाच्या सुमारास फुरसुंगी फाटा येथील ब्ल्यू-बेरी हॉटेल समोर घडली. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी वाघ यांच्या घरी त्यांना कारमधून कोणी घेऊन गेल्याचं सांगितल्यानंतर या प्रकरणी सतीश वाघ यांच्या मुलाने हडपसर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी चार अनोळखी व्यक्तींवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
Satish Wagh Murder News: सतीश वाघ जीवाच्या आकांताने ओरडले ‘वाचवा वाचवा’ पण…; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला अपहरणाचा थरार
मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली
दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करत असताना, यवत गावाच्या हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याबाबत यवत पोलिसांनी हडपसर पोलिसांना सूचित केलं. हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केल्यावर, तो मृतदेह सतीश वाघ यांचाच असल्याचं स्पष्ट झालं, अशी माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त आर. राजा यांनी दिली आहे.