Maha Yuti Government: विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ तारखेपासून नागपूरमध्ये होणार आहे. त्याआधी राज्यातील महायुती सरकारमधईल खातेवाटप होण्याची शक्यता आहे. यासाठी नागपूर-विदर्भातून कोणाला संधी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारमध्ये नागपूर-विदर्भातून कुणाला मंत्रिपदाची संधी मिळते, याकडे आता वैदर्भीयांचे लक्ष लागले आहे. तिन्ही पक्षात प्रबळ दावेदार असल्याने कोणत्या जिल्ह्यात कसा समतोल साधायचा, असा प्रश्न नेत्यांसमोर उभा ठाकला आहे. विभाग आणि सामाजिक समीकरणाचाही विचार केला जाण्याचे संकेत भाजप नेत्यांनी दिले.
विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संपल्यानंतर येत्या सोमवारपासून उपराजधानीत हिवाळी अधिवेशन होणार आहे. त्याची जय्यत तयारी झाली आहे. यावेळी विरोधी पक्षाकडे अपेक्षित संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेता राहील की नाही, हे अनिश्चित आहे. अधिवेशनात तीन मंत्र्यांवर भार येऊ नये, यासाठी त्यापूर्वी विस्तार केला जाणार आहे. नगरविकास, गृह, अर्थ यासारख्या महत्त्वाच्या खात्यावरून महायुतीत रस्सीखेच चालली असल्याची चर्चा आहे. कोणते खाते कोणत्या पक्षाला याचा निर्णय होताच नवीन मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंपनीचे डोकं फिरलं! सर्व्हे केला, ज्यांनी प्रश्नाचे उत्तर ‘हो’ दिले त्यांना कामावरून काढून टाकले, १००हून अधिकांना घरी बसवले
उपराजधानीला मुख्यमंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्यात मंत्रिपदी कुणाला संधी मिळते, याची उत्सुकता लागली आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली २०१४ ते २०१९ या काळात चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा व पालकमंत्री होते. गेल्या अडीच वर्षात फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री व पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. यावेळी किती मंत्री राहतात, याबाबत कुठलीच स्पष्टता नाही.
मुख्यमंत्रीजी आपल्याला कळकळीची विनंती; हा प्रश्न गंभीर होत आहे, आदित्य ठाकरेंचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे की शहरात चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले पूर्व नागपूरचे कृष्णा खोपडे यांच्यात जोरदार रस्सीखेच आहे. २०१४ साली भाजपची सत्ता आली त्यावेळी खोपडे शहराध्यक्ष होते. दक्षिण कायम राखणारे मोहन मते यांना संधी मिळावी, यासाठी त्यांचे समर्थक उत्सुक आहेत. १९९९ साली ते पहिल्यांदा विजयी झाल्याने त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार करण्यात यावा, अशी समर्थकांची भूमिका आहे.
ग्रामीणमधून डॉ. आशिष देशमुख की समीर मेघे अशी चर्चा चालली आहे. प्रचार संपण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सावनेर येथे झालेल्या सभेत डॉ. देशमुख यांना विजयी करा, मंत्री करून पाठवतो, असे जाहीर आश्वासन दिले होते. त्यामुळे देशमुख समर्थक उत्साहात आहेत.