Ambernath Crime News : वांद्रापाडा परिसरातील संस्थेच्या शाळेत धक्कादायक प्रकार सुरू होता. मुलांनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालिकांनी शाळेत धाव घेतली. त्यानंतर प्रकरण समोर आलं. पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
तो दारुच्या नशेत नव्हता…. विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या भेटीनंतर जुन्या मित्राचा दावा
अंबरनाथ पश्चिमेच्या वांद्रापाडा परिसरात एका सेवाभावी संस्थेची शाळा आहे. या शाळेत परिसरातील गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील काही अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत इथला शिक्षक अश्लील लैंगिक चाळे करत होता. तसंच या प्रकरणाचा व्हिडिओ तयार करून तो या मुलांना ब्लॅकमेल देखील करत होता. त्यामुळे घाबरलेल्या काही मुलांनी शाळेत जायला नकार दिल्यानंतर त्यांच्या पालकांनी चौकशी केली असता हा सगळा प्रकार उघड झाला आहे.
याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या नराधम शिक्षकाविरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज उल्हासनगर न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणामुळे अंबरनाथ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.