Maharashtra GST: गेल्या वर्षी आठ महिन्यांत १८ टक्के वाढ असताना, यंदा हा दर नऊ टक्क्यांवर आला आहे. नोव्हेंबरअखेर राज्यात दोन लाख ३० हजार ४७४ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.
हायलाइट्स:
- विकासकामांवर होणार परिणाम
- गेल्या वर्षी आठ महिन्यांत १८ टक्के वाढ
- नोव्हेंबरअखेर २.३० लाख कोटी रुपयांची वसुली
दुर्दैवी! बसमधून पडून १६ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; धावत्या बसचा दरवाजा अचानक उघडल्याने घटना
गेल्या आठ महिन्यांचा आढावा घेतल्यास एप्रिल ते नोव्हेंबरचा महसूल दोन लाख ३० हजार ४४७ कोटी रुपये इतका झाला. मागील वर्षी हे संकलन दोन लाख १३ हजार १४६ कोटी रुपये होते. या पार्श्वभूमीवर, आठ महिन्यांत जीएसटी महसुलात ८.१३ टक्के वाढ झालेली आहे. ही वाढ दिसत असली, तरी मागील वर्षाच्या वाढीच्या तुलनेत ती कमी आहे.
आता मंत्रिपदे, खात्यांवर खल; शिवसेनेला १०, तर ‘राष्ट्रवादी’ला सात कॅबिनेट मंत्रिपदे?
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्य व केंद्र सरकारने अनेक लोकप्रिय योजनांची घोषणा केली. लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी कर्जमाफी, विज बिल माफ अशा घोषणावर प्रचंड निधी खर्च झाला. त्यामुळे विकासकामांचा निधी या योजनांकडे वळवण्यात आल्याच्या तक्रारी झाल्या. यामुळे यंदा जीएसटी आणखी वाढणे आवश्यक होते. जीएसटी वसुलीच्या तुलनेत केंद्र सरकार राज्याला गंगाजळी देते. वसुली कमी झाल्याने केंद्राकडून निधी मिळण्याची शक्यता कमी आहे. यामुळे नवीन वर्षात विकासकामांवर मोठा परिणाम होण्याची चिन्हे आहेत. उर्वरित चार महिन्यांत वसुलीवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे ते किती जोर लावणार यावरच वसुलीचा आकडा अवलंबून राहणार आहे.
पालिका निवडणुका लवकरच! मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार
नोव्हेंबरपर्यंत आकडेवारी (कोटी रुपयांमध्ये)
वर्ष २०२२-२३ २०२३-२४ २०२४-२५
महाराष्ट्र १,७८,४७१ २,१३,१४६ २,३०,४७४
देश ११,९०,९१९ १३,३२,४४० १४,५६,७११