ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांचं निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. मधुकर पिचड यांची आज प्रकृती खालावली होती. ब्रेन स्ट्रोक आल्याने पिचड यांच्यावर दोन महिन्यांपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना १५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास राजूर येथील राहत्या घरी असताना ब्रेनस्ट्रोकचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना नाशिकच्या ९ पल्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मधुकर पिचड यांच्या जाण्याने चिरंजीव वैभव पिचड यांच्यासह कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय.