Sharad Pawar Greeting to Mahayuti Sarkar: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शरद पवार त्यांचे पुण्यातील निवासस्थान मोदी बाग येथे पत्रकारांशी बोलत होते. यादरम्यान त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले आणि नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.
शरद पवारांचे खास नंतर भाजपमध्ये प्रवेश, पंचायत सभापती ते राज्याचे मंत्री; मधुकर पिचड यांचा राजकीय प्रवास
शरद पवार म्हणाले, पिचड यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी आयुष्य पेरलं. पिचड आजारावर मात करतील असा आम्हाला विश्वास होता, पण तसं झालं नाही. राष्ट्रवादीच्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती, त्यांचं काम अतिशय उत्तम होतं. त्यासोबतच त्यांनी विधिमंडळतील अनेक खाती देखील संभाळली होती. आदिवासी भागात त्यांनी साखर कारखान्याची उभारणी करुन अनेकांच्या हाताला काम दिले. एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याचं आम्हाला दुःख आहे. हे दुःख सहन करण्यासाठी परमेश्वर त्यांच्या कुटुंबाला शक्ती देवो हीच प्रार्थना.
तसेच शरद पवार पुढे म्हणाले, ‘नव्या सरकारला आमच्या शुभेच्छा, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, संसदेचे अधिवेशन सुरू होतं ते सोडून येणं शक्य नव्हतं म्हणून मी आलो नाही.’ राज्यात विरोधीपक्ष नेता बाबा काय भूमिका? याबाबत विचारले असता पवार म्हणाले, राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याबद्दल राज्यात विधानसभा ठरवेल, आम्ही काय सांगायचं. ईव्हीएमसंदर्भातील लढा कसा करणार आहे? याबाबत विचारले असता ‘चर्चा सुरू आहे लवकरच पुढील दिशा ठरवू आणि सांगू’ असेही शरद पवार म्हणाले.