Raigad Crime News: कोकणात रायगड जिल्ह्यात अलिबाग समुद्र किनार्यावर धारदार शस्त्राने वार करत पोटात बिअरची बाटली खूपसून हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अलिबागच्या समुद्र किनाऱ्यावर शनिवारी रात्री किरकोळ कारणावरून मितेश जनार्दन पाटील या तरुणाची हत्या करण्यात आली होती. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात गडद चिरबे येथे राहणाऱ्या मितेश व त्याचा मित्र प्रथमेश पाटील हे दोघेही शनिवारी रात्री अलिबाग बीचवर आले होते. यावेळी दोघेही रात्री उशिरा बियर पिण्यासाठी बसले होते. यावेळी मद्यप्राशन करताना मितेशच्या हातातील बाटली सटकली आणि ती फुटली मग याचा मोठा आवाज झाला. यावेळी त्याठिकाणी शेजारी दारू पिण्यासाठी बसलेल्या अन्य पाच जणांच्या टोळक्याने मितेश व त्याच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याचवेळी दोघांना जबर मारहाण करण्यात आली. यावेळी मितेश व त्याचा मित्र प्रथमेश या दोघांनीही तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी मारहाण करणाऱ्या टोळक्यामधील एकाने मितेशच्या खांद्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या निर्दयीपणे केलेल्या मारहाणीत मितेश हा गंभीररित्या जखमी झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar Crime: भेटायला मैदानात बोलावलं, गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण
पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव व पोलीस उपनिरीक्षक गोसावी यांचे पथक तपासकिता नियुक्त करण्यात आले होती. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात पोलिसांनी यश आले आहे. तर अटक करण्यात आलेल्या तिघांनीही या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या सगळ्या धक्कादायक घटनेचा तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे करत आहेत.