Produced byविश्रांती शिंदे | Contributed byअर्जुन राठोड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम1 Jan 2025, 9:40 pm
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज नांदेड दौऱ्यावर आले होते. नांदेडच्या माळेगाव येथील श्री खंडोबाचे त्यांनी आज दर्शन घेतले.गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतोय त्यांना आरक्षण मिळू दे.शेतकरी अडचणीत आहेत, त्यांना बळ मिळावं. सरकारने त्यांना मदत करावी.असा आशीर्वाद आपण खंडोबाकडे मागितल्याचे मनोज जरांगे म्हणाले. आरक्षण नसल्यामुळे गरिबांच्या लेकराच आयुष्य बरबाद होत आहे.नवीन वर्ष येतात जातात, पण आम्हाला न्याय कधी मिळेल याची अपेक्षा आहे.खरं नवीन वर्ष आमच ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी असेल.