Mumbai News: मराठी चालणार नाही, माझ्याशी मारवाडीतच बोला, असा हट्ट मराठी महिलेकडे धरणाऱ्या दुकानदाराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.
गिरगावच्या खेतवाडीत राहणाऱ्या विमल म्हसकर काल (२ डिसेंबरला) संध्याकाळी साडे सातच्या सुमारास महादेव स्टोअरमध्ये गेल्या होत्या. खरेदी करताना त्या दुकानदाराशी मराठीत बोलल्या. त्यावर दुकानदारानं मराठीत का बोलता म्हणून जाब विचारला. महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे. त्यामुळे मारवाडीत बोललं पाहिजे. मराठीत बोललेलं आम्ही सहन करणार नाही, असं दुकानदार म्हणाला. त्यामुळे म्हसकर संतापल्या.
Ajit Pawar: अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण समोर; शिंदेंचं टेन्शन वाढणार, भुजबळांनी ‘हिशोब’ काढला
‘आम्ही मारवाडीत का बोलायचं असा प्रश्न मी दुकानदाराला तीनवेळा विचारला. त्यावर आता भाजपचं सरकार आलंय. मारवाडीत बोलायचं. मराठीत बोलायचं नाही. आता मुंबई भाजपची, मुंबई मारवाड्यांची, असं उत्तर त्यानं हिंदी भाषेत दिलं,’ अशा शब्दांत म्हसकर यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला. म्हसकर यांनी हा प्रकार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातला. मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
Eknath Shinde: मी तुमच्या जागी असतो तर…; उप होण्यासाठी शिंदेंना ‘वरुन’ आग्रह; परिणामांची दिली कल्पना
मारवाडी दुकानदाराची तक्रार घेऊन म्हसकर स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांच्याकडे गेल्या. ते भाजपचे नेते आणि माजी मंत्री आहेत.
‘मी तक्रार घेऊन गेले असताना लोढा साहेबांनी मला उद्धटपणे उत्तरं दिली. ही आमच्यात भांडणं लावायचं काम करतंय म्हणाले. या लोढा साहेबांना आम्ही आजपर्यंत पाठिंबा दिला. आमच्या दक्षिण मुंबईत त्यांना निवडून आणलं आणि आता ते समोरुन म्हणतात, मी यांना ओळखत नाही. लोढा साहेबांना आमची ओळखच पाहिजे का? तुम्ही आमच्या मलबार हिलचे आमदार आहात. हे पुरेसं नाही का?,’ असे सवाल म्हसकर यांनी विचारले. लोढा १९९५ पासून मलबार हिलचे आमदार आहेत. ते सलग सातवेळा विधानसभेची निवडणूक जिंकले आहेत.