Bachchu Kadu criticizes BJP : मुख्यमंत्री शिंदेंच्या नाराजीच्या चर्चेवर बच्चू कडू यांनी मोठे विधान केले आहे. भाजपकडून शिंदेंची कोंडी केली जात असल्याचे वक्तव्य कडू यांनी केले. बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बच्चू कडू यांनी हे विधान केले आहे. तर सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता असेही बच्चू कडूंनी सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी मैत्री टिकवण्यासाठीही फोन करायला हवा होता असंही ते म्हणाले.