• Thu. Dec 26th, 2024

    राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात दिसू शकतात ‘हे’ चेहरे, सुनील शेळके आणि संग्राम जगताप..

    राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळात दिसू शकतात ‘हे’ चेहरे, सुनील शेळके आणि संग्राम जगताप..

    NCP Ajit Pawar Party Future Minister Prediction: विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीला सरळ बहुमत मिळाल्यानंतर शपथविधी 5 डिसेंबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आता कोणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरलाय. विशेष म्हणजे महायुतीला सरळ बहुमत मिळालंय. राज्याचे नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 5 डिसेंबर रोजी शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पोहोचणार आहेत. शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. सुरूवातीला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा केला. आता हे स्पष्ट आहे की, भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आहे.

    शपथविधी सोहळ्यात अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील हे स्पष्ट आहे. आता राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्रिमंडळाची यादी पुढे येताना दिसतंय. छगन भुजबळ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांचे मंत्रीपदे कायम राहणार आहेत. नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, संग्राम जगताप, सुनील शेळके, इंद्रनील नाईक, दत्ता भरणे, अनिल पाटील यांचीही नावे मंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते असण्याची शक्यता आहे.
    Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचा गृहमंत्रिपदासाठी अट्टहास कशासाठी? संजय राऊतांनी एका वाक्यात सांगितलंआता मंत्रीपदाची माळ नक्की कोणाच्या गळ्यात पडते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. महायुतीच्या नेत्यांची बैठक आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे. शपथविधीच्या अगोदरील या बैठकीला महत्व आले. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला नेमकी किती मंत्रीपदे येतात, हे आता स्पष्ट होईल. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चांगली कामगिरी केलीये.

    सुनील शेळके यांनी मावळमधून निवडणूक लढवली. मोठ्या मत्ताधिक्याने ते निवडून आले. सुनील शेळके आणि संग्राम जगताप यांची मंत्रीपदावर वर्णी लागू शकते, अशी चर्चा आहे. सुनील शेळके यांनी अनेक वर्ष भाजपा युवा मोर्चामध्ये काम केले. त्यांनी विधानसभेची निवडणूक ही राष्ट्रवादीकडून लढवली. यासोबतच अजून काही नावे मंत्रीपदासाठी चर्चेत असल्याचे बघायला मिळतंय. भाजपाकडूनही अनेकजण मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून गेलेली रक्कम संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करण्याच्या सूचना – महासंवाद
    नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष लक्ष केंद्रित करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद
    सांस्कृतिक, सामाजिक प्रबोधनाबरोबरच रोजगार निर्मिती – सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed