• Fri. Mar 20th, 2026

    Amol Mitkari Post : ‘दादा, आम्हाला माफ करा, आम्ही कपाळ करंटे’; अमोल मिटकरींची भावूक पोस्ट, अजित पवारांची मागितली माफी

    Amol Mitkari Post : ‘दादा, आम्हाला माफ करा, आम्ही कपाळ करंटे’; अमोल मिटकरींची भावूक पोस्ट, अजित पवारांची मागितली माफी

    Amol Mitkari Post on Ajit Pawar : विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स (X) अकाउंटवर भावनिक विधान करत दिवंगत अजित पवार यांची माफी मागितली आहे.

    अमोल मिटकरी ऑन अजित पवार अपघात पोस्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अकोला : ‘आदरणीय दादा आम्हाला माफ करा…आता आवाज काढावा इतका पण आवाज शिल्लक नाही’, असं भावनिक विधान करत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ांची माफी मागितली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाबाबत काहीच चर्चा न झाल्यानं मिटकरींनी तीव्र शब्दात नाराजी बोलून दाखवली आहे.

    आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून सातत्याने अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या मृत्यूच्या विषयावर चर्चा करण्याची मागणी होत आहे. मात्र, विधान परिषदेसोबतच विधानसभेतही याबद्दल फार चर्चा झालेली नाही. आमदार मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना याबद्दल अनेकदा खंत व्यक्त केली. त्यानंतर आता त्यांनी त्यांच्या एक्स (X) अकाउंटवर एक भावूक पोस्ट केली आहे.
    Maharashtra TimesPune Crime : जुन्या वादाचा राग, चहा पिताना अचानक आले; ‘तू मला शिवी का दिली?’ विचारत पुण्यात तरुणावर जीवघेणा हल्ला

    ‘दादा, आम्हाला माफ करा’

    ‘आदरणीय दादा आम्हाला माफ करा…आता आवाज काढावा इतका पण आवाज शिल्लक नाही. लोकांच्या प्रपंचाला व सामान्य अतिसामान्य माणसाला न्याय देणारे तुम्ही, दुर्दैवाने तुम्हालाच न्याय नाही. आज इतर कुणासोबत अशी दुर्घटना घडली असती व तुम्ही आज असता तर सगळे सुतासारखे सरळ केले असते व चर्चा लावली असती. मात्र, ह्यामागील अदृश्य शक्ती ओळखता येत नाहीये. दादा खरच मोठ्या मनाने माफ करा…आम्ही कपाळ करंटे…’

    अमोल मिटकरी काय म्हणाले?

    आमदार अमोल मिटकरींनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, ‘दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्घटनेची चर्चा तिसऱ्या आठवड्यात पण नाही, दुर्दैवाने एकही ठोस चर्चा नाही. अदृश्य शक्ती चर्चा लाऊ देत नाही, अशी शंका उपस्थित करावी का? की सरकार झोपेत आहे?’, असा संतप्त सवाल करत त्यांनी सरकार जागे व्हा, सत्य बाहेर आणा आणि जबाबदारी निश्चित करा’, अशी मागणी केली आहे.
    Maharashtra TimesSolapur Crime : दुपार झाली तरी दार बंद, शेजाऱ्यांनी दरवाजा तोडला तर दाम्पत्याची बॉडी आढळली; PM रिपोर्टमध्ये मोठी माहिती

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा