• Thu. Dec 26th, 2024
    गळ्यात हात टाकताच पोटात चाकू भोसकला, संभाजीनगरमधील ‘त्या’ हत्येचं आरोपींनी सांगितलं कारण

    Chhatrapati Sambhajinagar Murder News: दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला.

    हायलाइट्स:

    • वाद मिटवायचा सांगून मैदानात भेटायला बोलावलं
    • गळ्यात हात टाकताच दोघांनी पोटात चाकू भोसकला
    • छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ
    Lipi
    संभाजीनगर हर्सुल जेल तरुणाची हत्या

    सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : हर्सूल जेल समोरील मैदानावर २६ वर्षीय तरुणाच्या खुनामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. या खुनाचं कारण अखेर समोर आलं आहे. ६ महिन्यापूर्वी झालेल्या जुन्या वादामुळे मयताने आरोपीला मारहाण केली होती. हा राग मनात धरून आरोपींनी मयताला मैदानात बोलावून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी १२ तासाच्या आत गुन्हे शाखेने २ आरोपींना चिकलठाणा येथून अटक करण्यात आले असल्याची माहिती बेगमपुरा पोलिसांनी दिली आहे.गणेश विनोद सोनवणे (वय २७, रा. अंबर हील जटवाडा रोड) आणि अनिकेत उर्फ विक्की रमेश गायकवाड (वय २४, रा. एच.पी गल्ली, एकता नगर) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दिनेश (ऊर्फ बबलू) परमानंद मोरे (वय २६, रा.चेतना नगर हर्सूल) असं मयत तरुणाचं नाव आहे. दरम्यान, जुना वाद मिटवायचा आहे, असं सांगून दिनेश (ऊर्फ बबलू) याला गणेश सोनवणे आणि अनिकेत गायकवाड यांनी सोमवार दि.२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास हर्सूल जेल समोरील एन १३ मैदानावर बोलावले. दिनेश तिथे जाताच आरोपींनी गळ्यात हात टाकत गप्पा सुरू केल्या. तेवढ्यात दोघांनी दिनेश याच्या पोटात चाकूने भोसकले. इतर आरोपींनी बॅट, रॉडने बेदम मारहाण केली. यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत असलेला सुमित चव्हाण याने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्याला देखील चाकूने भोसकले. यात सुमित गंभीर जखमी झाला. नागरिकांनी दिनेश याला रिक्षात टाकून घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
    Today Top 10 Headlines in Marathi: बुलेट खाऊ पण मतदान बॅलेटवरच करु, मारकडवाडीत जानकर समर्थक आक्रमक, शेतकऱ्यासाठी राबलेल्या ‘धर्मराज’चं निधन; परिवारासह अख्खं गाव हळहळलं; सकाळच्या दहा हेडलाईन्स

    दिनेशचा खून झाल्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही माहिती मिळताच खून करून आरोपींनी पसार होण्याचा प्लॅन केला. गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक काशिनाथ महांडुळे, पोलीस उप निरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाला गुप्त बातमीदाराने माहिती दिली. आरोपी हे चिकलठाणा येथील बाजारात असल्याचं गुप्त बातमीदाराने सांगितलं. त्यानंतर पथकाने आरोपींना अटक केली आणि आरोपींना बेगपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा विस्तार तालुकास्तरावर – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
    विभागीय क्रीडा संकुल समिती, छत्रपती संभाजीनगरच्या बँक खात्यातून गेलेली रक्कम संकुल समितीच्या बँक खात्यात त्वरीत जमा करण्याच्या सूचना – महासंवाद
    नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष लक्ष केंद्रित करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed