Nilesh Lanke Takes Jab on Vikhe Patil: विधानसभा निवडणुकीत पत्नी राणी लंके यांचा काठावर पराभव झाला. हा निश्चितच चिंतनाचा भाग आहे. मात्र, आजचा आणि येणारा काळही आपलाच आहे. नीलेश लंके हा उगवता सूर्य आहे, तो खचत नाही, असे म्हणत खासदार नीलेश लंके यांनी विखे पाटलांवर मोठा आरोप केला आहे.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून राणी लंके यांचा पराभव झाला. त्यसंबंधी चिंतन करण्यासाठी खासदार लंके यांनी सुप्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलाविली होती. त्यामध्ये बोलताना लंके म्हणाले, या निवडणुकीत ज्या चुका झाल्या, त्या दुरूस्ती करू. आता आरोग्य शिबिराचे आयोजन करून पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरूवात करू. आपण आपल्या कामाच्या जोरावर राज्यात ओळख निर्माण केली आहे. विधानसभेत पराभव झाला म्हणून आपले राजकारण संपलेले नाही. चुकांच्या दुरूस्त्या करा. समाजाला दोष देऊ नका, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
Rohit Pawar: शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी; आबांच्या लेकाच्या नावावर मोठा विक्रम
ईव्हीएम बद्दल बोलताना लंके म्हणाले, या निवडणुकीत यांत्रिकीकरणाने घात केला आहे. कोणी काही म्हणत असले तरी मी आमदार नाही तर जिल्हयाचा खासदार आहे. प्रस्थापित व घराणेशाही विरोधात माझा उदय झाला आहे. त्यामुळे संघर्ष मला नवा नाही. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपण सतर्क राहिलो असतो तर आपल्या वाट्याला हा पराभव आला नसता, एकमेकांमधील जिरवाजिरवीचे राजकारण आता बंद करा, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.
लंके म्हणाले, निवडणूक ही बंदुकीची गोळी असते. एकदा सुटली की सुटली. राजकारणात आज जाती धर्माचा रंग दिला जात असून एक दिवस भारताचा श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. देश एकसंघ राहण्यासाठी जाती-पातींचे राजकारण योग्य नाही, असेही लंके म्हणाले.