Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर
२. महाराष्ट्रातील महायुतीमधील राजकीय नाट्य काही संपताना दिसत नाही. येत्या ५ डिसेंबरला नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे, त्यासाठी मुहूर्तही ठरला आहे. इतकंच काय तर, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार असून मुख्यमंत्रीपद हे भाजपकडे असणार असून यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालं आहे.
३. नगर जिल्ह्यातील १२ पैकी दहा मतदारसंघातील पराभूत उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत इव्हीएम च्या पडताळणीची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी शुल्कही भरले असून यानुसार ४५ दिवसांची मुदत संपल्यानंतर ७४ ठिकाणच्या इव्हीएमची पडताळणी केली जाणार आहे. बातमी वाचा सविस्तर…
४. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाबळेश्वर तालुक्यातील दरे या आपल्या गावी मुक्कामी आहेत. गृहमंत्रिपदाची मागणी करूनही ते न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. शिंदे यांच्या घशाला संसर्ग झाला असून, सध्या सर्दी-तापाने आजारी असल्याचे समोर आले आहे. या माहितीला सातारा जिल्ह्यातील डॉक्टरांच्या पथकाने दुजोरा दिला आहे. बातमी वाचा सविस्तर…
५. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करतात, असा घणाघाती आरोप करणारे मध्य नागपुरातील पराभूत उमेदवार बंटी शेळके यांना ‘तुम्हाला पक्षातून काढण्यात का येऊ नये’, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.
६. राज्याच्या नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याची उत्सुकता असतानाच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावी गेले असून, मोठा निर्णय घेण्यासाठीच ते त्यांच्या दरे गावी जातात, असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी शनिवारी केले. तर शिवसेनेकडे गृहखाते दिल्यास आम्ही उत्तम संभाळू शकतो, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
७. मुंबईमध्ये शनिवारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कुर्ला बेस्ट आगारामध्ये सुरू असलेल्या विकासकामांनी एका चिमुकल्याच्या बळी घेतला आहे. इमारत उभारण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. त्या मुलाचे वय अवघे ७ वर्षे होते.
८. उदित नारायण हे बॉलिवूडमधील उत्तम गायकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. आजही बॉलिवूडमध्ये त्यांच्या सुमधूर आवाजाची जागा कोणीही घेऊ शकलेले नाही. उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी बिहारच्या सुपौल जिल्ह्यात झाला. आज ते त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यापूर्वी उदीत नारायण यांनीही इतरांप्रमाणे खूप संघर्ष केला होता. जवळपास १० वर्षे बॉलिवूडमध्ये खटपट केल्यानंतर अखेर एका गाण्याने उदित यांचे नशीब बदलले.
९. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा २३३ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात २४ वर्षीय मार्को यान्सन दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठा हिरो ठरला. त्याने अशा प्रकारे गोलंदाजी केली की श्रीलंकेच्या फलंदाजांना तो टिकाव धरता आला नाही आणि त्याच्यामुळेच आफ्रिकन संघ शानदार पद्धतीने सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. मार्को यान्सनने या सामन्यात अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत.
१०. राज्याच्या अनेक जिल्ह्यांत थंडीचे प्रमाण वाढले असून, शनिवारी नाशिकच्या उत्तर भागामध्ये सर्वांत कमी म्हणजे, ८.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिली. शनिवारी सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वीच्या बारा तासांतील ही तापमान नोंद आहे. बीड; तसेच सोलापूर जिल्ह्यातील जेऊर येथे १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगर येथे १०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.