Rohit Patil : “आर आर आबा या आधी माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी सागितलं होतं की राजकारणापासून चांगले लोक बाजूला राहिले तर तो बदमाशांचा अड्डा बनेल. राजकारणाला बदमाशांचा अड्डा बनवू द्यायचा नाही. त्यामुळेच राजकारणात राहायचा निर्णय घेतला.”
हायलाइट्स:
- राजकारणात राहण्याचं कारण काय?
- रोहित पाटलांनी सांगितलं कारण
- आर आर आबा नेहमी म्हणायचे…
”आजच्या तरुणांची राजकारणाकडे पाहण्याची दृष्टी जरी नकारात्मक असली तरी ती कुणीतरी बदलायला हवी. जुन्या लोकांनी राजकारणात जी संस्कृती टिकवली होती ती कायम ठेवायला हवी” असं रोहित पाटील म्हणाले.
रोहित पाटील म्हणाले की, “रोहित पवारांनी जी संघर्ष यात्रा सुरू केली होती त्यामध्ये चालताना अनेक प्रश्न लक्षात आले. बीडमध्ये जाताना एका लहाण मुलाला रोहित पवारांनी विचारलं की मोठं होऊन तुला काय व्हायचं आहे. त्यावर तो मुलगा म्हणाला की मला गवंड्याच्या हाताखाली काम करायचं आहे. त्याच्या आजूबाजूला जे दिसतं त्यावरून त्या मुलाने ते उत्तर दिलं. त्यावर इथल्या लोकांचे, मुलांचे प्रश्न लक्षात आले. हे सर्व प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करणार आणि या लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार.” दरम्यान, रोहित पाटलांनी बोलताना आपल्या वडिलांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.