Navi Mumbai Crime News : नवी मुंबईत ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन शेजारच्यांमध्ये झालेल्या भांडणानंतर आरोपीने घरात घुसून बाळावर हल्ला केला.
काय आहे नेमकं प्रकरण?
दोन शेजाऱ्यांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर दोन्ही शेजाऱ्यात मोठं भांडण झालं. दोघांमधील वाद टोकाला पोहोचला. या वादादरम्यान, शेजारचा व्यक्ती दुसऱ्या बाजूला राहणाऱ्या शेजारच्याच्या घरात कुऱ्हाड घेऊन शिरला. त्यानंतर या शेजाऱ्याने रागाच्या भरात त्या घरातील ९ महिन्यांच्या चिमुकल्या बाळावर थेट कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी झाला. थोडक्यात चिमुकला बचावला आहे.
Maharashtra CM : महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच ‘Boss’! दिल्ली हाय कमांड पुन्हा एकदा वापरणार धक्का तंत्र?
बाळाचा जीव थोडक्यात बचावला
शेजारच्याने कोणाला काही समजायच्या आत बाळावर हल्ला केला. हा हल्ला इतक्या वेगात करण्यात आला, की त्या बाळाला हल्ल्यापासून दूर करण्याआधीच त्याच्यावर आरोपीवर कुऱ्हाड मारली. बाळाला या गंभीर जखम झाली आहे. बाळावर हल्ला केल्यानंतर तात्काळ या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी त्याची आई धावली. तिने पुढे होणारा हल्ला परतवून लावला.
Alert! मुंबईतील या भागात फुफ्फुस, हृदय, डोळ्यांच्या समस्या, कारण काय? डॉक्टरांनी दिला सल्ला
बाळावर हल्ला करुन आरोपी फरार, पोलिसांत गुन्हा दाखल
आईने चिमुकल्याला कवटाळून हल्लेखोराचा हल्ला परतवून लावला. त्यानंतर हल्लेखोर शेजाऱ्याने पळ काढला. या घटनेनंतर लोकांमध्ये भीती पसरली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ९ महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करून आरोपी फरार झाला आहे. या प्रकारानंतर आरोपीच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News : शेजाऱ्यांमध्ये वाद टोकाला, घरात घुसून थेट ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार; घटनेने खळबळ
चिमुकल्याच्या कपाळावर मोठी जखम
शेजारच्याने ९ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात बाळाच्या कपाळावर गंभीर जखम झाली आहे. त्याच्या डोक्यापासून, कपाळावर आणि अर्ध्या नाकापर्यंत मोठी जखम झाली आहे. बाळाला कपाळावरुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे.