• Thu. Nov 28th, 2024

    दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा

    दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा

    Maharashtra New CM News : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची लवकरच घोषणा केली जाईल अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या घरी महायुतीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर मोठ्या घोषणेची शक्यता आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या असून या संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गुरुवारी रात्री दिल्ली केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी पोहोचले असून या तीन नेत्यांसह अमित शाहांची बैठक सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसंच २ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन होऊ शकतं, अशीही माहिती आहे.

    शिंदेंनी मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडल्यानंतर फडणवीसांनीचे मोठे वक्तव्य; लोकांच्या मनातील किंतू परंतू…

    अमित शाहांच्या घरी महाबैठक

    गुरुवारी रात्री सुरुवातीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शाहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर काही वेळाने देवेंद्र फडणवीस, खासदार सुनील तटकरे आणि अजित पवार अमित शाहांच्या भेटीला गेले. गुरुवारी रात्री जवळपास १० वाजून २० मिनिटांपासून महायुतीचे नेते अमित शाहांच्या घरी पोहोचले. महायुतीच्या नेत्यांची अमित शाहांसोबतच्या भेटीनंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण होणार याची घोषणा होऊ शकते. चले.

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदासाठी ठाण्यात देवाला साकडे, मंदिरांमध्ये महिलांच्या महाआरत्या, दर्ग्यातही सामूहिक प्रार्थना
    एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, की बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. आता हा लाडका भाऊ दिल्लीत आला आहे. माझ्यासाठी लाडका भाऊ हेच सर्वात मोठं पद असल्याचं ते म्हणाले. दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा अमित शाहांसोबतचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस स्मित हास्य करताना दिसत आहेत. या फोटोवरुन राजकीय वर्तुळात फडणवीस हेच तिसऱ्यांदा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होत आहे.

    amit shah devendra fadnavis eknath shinde

    दिल्लीत अमित शाहांच्या निवासस्थानी महायुतीचे नेते; राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच मोठी घोषणा

    दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने २८८ जागांपैकी २३० जागा जिंकल्या. भाजपने १३२, शिवसेना ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ जागा जिंकल्या. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने (UBT) २० जागा, काँग्रेसने १६ आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीने (SP) १० जागा जिंकल्या.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed