Vidhan Sabha Nivadnuk Nikal: पुण्यात महायुतीने २१ पैकी १८ जागांवर विजय मिळवला आहे. तर, अजित पवारांनी शरद पवाराच्या गडाला सुरुंग लावला आहे, शरद पवारांच्या पक्षाला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.
अजित पवारांचा काकांना धोबीपछाड
पुण्यातील २१ पैकी ११ जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या होत्या. पैकी अजित पवार आणि शरद पवार यांचे पक्ष सात ठिकाणी एकमेकांना भिडले. त्यातील सहा ठिकाणी ‘दादां’नी ‘काकां’ना अस्मान दाखवले. जुन्नर येथील जागा अजित पवारांनी गमवली असली, तरी तेथे अपक्ष उमेदवार शरद सोनवणे निवडून आले आहेत. सोनवणे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्याने ही जागाही सत्ताधाऱ्यांना मिळाली आहे. मावळ येथील महायुतीचे उमेदवार सुनील शेळकेंच्या विरोधात भाजपच्या माजी आमदारांसह सर्व विरोधक एकवटले होते. मात्र, शेळके यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्य घेऊन विरोधकांना चितपट केले. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचा शंकर मांडेकर या अजित पवारांच्या नवख्या शिलेदाराने केलेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.
बारामतीत शरद पवार यांनी अजित पवारांविरोधात युगेंद्र पवारांना उमेदवारी देऊन ‘पवार विरुद्ध पवार’चा नारा दिला होता. प्रत्यक्षातील लढाईत युगेंद्र यांना तेवढी ताकद मिळाली नाही. त्यामुळे अजित पवारांचा नेहमीसारखाच एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय झाला. त्यामुळे बारामतीसह जिल्ह्यावर वर्चस्व राखून अजित पवार पुढील पाच वर्षांसाठी पुण्याचे कारभारी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे पुण्यातील एकमेव आमदार असलेले अशोक पवार यांचाही दारूण पराभव झाला आहे. त्याच वेळी इंदापुरातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सलग तिसऱ्यांदा पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केली आहे.
Pune News: शरद पवारांच्या गडाला महायुतीचा सुरुंग; लोकसभेचा वचपा काढला, पुतण्याकडून काका चारीमुंड्या चित
शरद पवार यांच्या पक्षाचे पुण्यातील एकमेव आमदार असलेले अशोक पवार यांचाही दारूण पराभव झाला आहे. त्याच वेळी इंदापुरातून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना सलग तिसऱ्यांदा पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विजयाची ‘हॅटट्रिक’ केली आहे. < दोन्ही शिवसेनेला प्रत्येकी एक जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने खेड आणि कोथरूड अशा दोन जागा लढवल्या होत्या. पैकी खेडमध्ये ऐन वेळी उमेदवारी दिलेले बाबाजी काळे यांनी मोठे मताधिक्य मिळवून दिलीप मोहिते या अजित पवार गटातील विद्यमान आमदारांचा पराभव केला. पुरंदरमधून शिवसेनेचे उमेदवार आणि माजी मंत्री विजय शिवतारे तिरंगी लढतीत विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार संजय जगताप यांना पराभूत केले आहे.